छत्रपती संभाजीराजे यांची प्रतिक्रिया पुणे :पुण्यात जेव्हा स्वराज्य या संघटनेची घोषणा केली तेव्हा ही संघटना राजकारणात येईल अशी शक्यता मी व्यक्त केली होती. या सात ते आठ महिन्यात स्वराज्याचा जो प्रवास आहे. लोकांचे ज्या आशा आणि अपेक्षा आहे. ते पाहता सुसंस्कृत महाराष्ट्रात पाहिजे. सध्या ची परिस्थितीती पाहता आणि जे काही महाराष्ट्रात चालले आहे हे आम्हाला बघवत नाही. म्हणून 2024 साली कुठल्याही परिस्थितीत स्वराज्य निवडणूक लढवणार असल्याची घोषणा संभाजीराजे यांनी केली.
सखोल चौकशी व्हायला हवी :पुण्यातील एस एम जोशी येथे छत्रपती संभाजीराजे यांच्या अध्यक्षतेखाली पुस्तकं प्रकाशन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होत, यावेळी ते बोलत होते. यावेळी राजे यांना अतिक अहमद गोळीबार प्रकरणी विचारलं असता ते म्हणाले की याला कायदेशीर प्रक्रिया आहे. कायद्याला मानणारा मी आहे. त्या घटनेची सखोल चौकशी व्हायला हवी. कायदेशीर प्रकिया आहे, त्याबद्दल न्याय व्यवस्था योग्य तो निर्णय घेईल अस देखील यावेळी संभाजीराजे म्हणाले.
समिती गठीत करून पुरस्कार :राज्य सरकारकडून आज महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला गेला आहे. यावर राजे यांना विचारले असता ते म्हणाले की मी या वादात पडणार नाही. आज अनेक जण खऱ्या अर्थाने महाराष्ट्रसाठी आयुष्य घालवत आहे. त्यांनाही पुरस्कार दिला पाहिजे. हा पुरस्कार देण्यासाठी एक समिती गठीत करून महाराष्ट्रभूषण सारखे पुरस्कार देण्यात यावे, अस देखील यावेळी राजे म्हणाले.
शेतकऱ्यांसाठी लॉंग टाइम पॉलिसी :सरकार बाबत विचारलं असता संभाजीराजे म्हणाले की आमचा एकच इव्हेंट आहे, बाकी काही नाही. मला स्वराज्य पक्षा विषयी विचारा मला वज्र्यमूठ वगैरे काही घेणं देणं नाही. मी मविआचा प्रवक्ता नाही. तसेच अवकाळी पावसाबाबत ते म्हणाले की शेतकऱ्यांसाठी लॉंग टाइम पॉलिसी करायला हवी. परत परत गोष्ठी घडत असतील तर काय सांगावे अस देखील यावेळी राजे म्हणाले. बीआरएसबाबत संभाजीराजे यांना विचारलं असता ते म्हणाले की बीआरएस महाराष्ट्रात येत असेल तर स्वागत आहे. मी ही त्यांना भेटलोय त्याच्याबरोबर माझीही चर्चा झाली आहे, अस देखील यावेळी राजे म्हणाले.
हेही वाचा - Sharad Pawar On Atiq Ashraf Murder : अतिक- अश्रफ हत्येबाबत शरद पवार म्हणाले...