महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सरकारने दूधवाढीसंदर्भात भूमिका न बदलल्यास मंत्र्यांना दुधाने आंघोळ घाला - राजू शेट्टी - raju shetty on milk rates news

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली बारामतीत आंदोलन करण्यात आले. यावेळी दूध उत्पादक शेतकऱ्यांनी या मोर्चात राजू शेट्टी यांनी दिलेल्या हाकेला प्रतिसाद देत शेकडो दूध उत्पादकांनी जनावरे घेऊन या आंदोलनात सहभाग घेतला.

राजू शेट्टी
राजू शेट्टी

By

Published : Aug 27, 2020, 5:09 PM IST

पुणे : राज्यातील खासगी व सहकारी दूध संघाकडून अपवाद वगळता 17 ते 18 रुपये दुधाला दर दिला जात आहे. आणि हेच दूध संघ वाले संकलित केलेले दूध सरकारला पंचवीस रुपयांनी विकले जाते. मुख्यमंत्री साहेब मातोश्रीतून बाहेर पडा आणि डोळे उघडून बघा, राज्यात अलीबाबा चाळीस चोरांचे काय चालले आहे. यात सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षातील लोक शेतकऱ्यांना लुटत आहेत. मात्र, जर तुम्ही हे उघड्या डोळ्यांनी बघत असाल तर शेतकऱ्यांनी आंदोलन का घेऊ नये, असा खडा सवाल राजू शेट्टी यांनी विचारला आहे.

राजू शेट्टी यांची प्रतिक्रिया

मागील काही दिवसांपासून दूध उत्पादक शेतकऱ्यांचे विविध मागण्यांसंदर्भात राज्यभरात आंदोलने सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली बारामतीत आंदोलन करण्यात आले. यावेळी दूध उत्पादक शेतकऱ्यांनी या मोर्चात राजू शेट्टी यांनी दिलेल्या हाकेला प्रतिसाद देत शेकडो दूध उत्पादकांनी जनावरे घेऊन या आंदोलनात सहभाग घेतला. येथील शारदा प्रांगण येथून सुरू झालेला मोर्चा शहरातील भिगवन चौक, इंदापूर चौक, गुणवडी चौक, शिवाजी चौकातून प्रांत कार्यालयावर धडकला. गाईच्या दुधाला प्रति लिटर ५ रुपये अनुदानासह २५ रुपये दर मिळावा. केंद्रसरकारने दूध पावडर आयातीचा निर्णय तत्काळ रद्द करावा. दुग्धजन्य पदार्थावरील जीएसटी कर रद्द करावा. आदी मागण्यांसाठी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.

दूध उत्पादकाचा खर्च 32 रुपये आहे. आणि गाईच्या दुधाला 17 रुपये भाव मिळत असेल. तर त्या गाईचे खाद्य आणि वैद्यकीय उपचार करायचे कसे हा आमचा मूळ प्रश्न आहे. नफा तर राहिला बाजूलाच मात्र जनावरे जगवण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. हीच आमची समस्या सरकारपर्यंत पोहोचण्यासाठी राज्यभरात दुभत्या जनावरांसह मोर्चे काढत असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी सांगितले. दुधाचा प्रश्‍न निर्माण होण्यास केंद्र सरकारच जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला. केंद्र सरकारने लॉकडाऊन जाहीर केल्यामुळे दुधाचे दर कमी झाले. अन्यथा आज गाईच्या दुधाला 40 रुपये प्रति लिटर भाव असता. मात्र, लॉकडाऊनमुळे दुधाचा खप 40 टक्क्यांनी खाली आले असल्याचे शेट्टी म्हणाले.

मंत्र्यांना दुधाने आंघोळ घाला....

दूध दरवाढीसंदर्भात सरकारने आपली भूमिका न बदलल्यास मंत्र्यांना दुधाने अंघोळ घालण्याचे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना राजू शेट्टी यांनी केले. तसेच सध्याचे राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ऐकण्यातले सरकार आहे. त्यांनी मध्यस्थी करून दुधाचा प्रश्न सोडवावा असेही शेट्टी यावेळी म्हणाले.

हेही वाचा -मंदिर बंद असल्याचा फायदा घेत चोरट्यांनी देवीच्या दागिन्यांवर मारला डल्ला, जुन्नर तालुक्यातील घटना

ABOUT THE AUTHOR

...view details