बारामती (पुणे) - दूध दरवाढीसाठी राज्यभरात आंदोलन करण्याचा निर्णय स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी घेतला आहे. मात्र, पुणे जिल्ह्यातील आंदोलन पुणे शहराऐवजी बारामतीत करणार असल्याचे शेट्टी यांनी स्पष्ट केले आहे.
दूध दरवाढ : बारामतीत 'स्वाभिमानी' आंदोलन, शरद पवारांच्या निवासस्थानी राजू शेट्टी आणणार जनावरे - pune raju shetti news
दूध दरवाढीसंदर्भात राज्य सरकारने शेतकरी हिताकडे दुर्लक्ष केले असल्याचा आरोप करून आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रत्येक दिवशी हे आंदोलन जिल्हानिहाय होणार असून, पुणे जिल्ह्यातून पुणे शहराऐवजी बारामतीची निवड करण्यात आली आहे. बारामतीत हे आंदोलन जनावरांना सोबत घेऊन करण्यात येणार असल्याचे शेट्टी यांनी प्रसारमध्यमांना सांगितले.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आणण्यात शेट्टींची महत्त्वाची भूमिका होती. यापूर्वी शेतकरी हितासाठी साखर दरासंदर्भात राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानासमोर अनेक आंदोलने केली होती. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर काही दिवसात शरद पवार आणि राजू शेट्टी यांची दिलजमाई झाली असल्याचे चित्र राज्यासमोर उभे राहिले होते. त्यावेळी राजू शेट्टी यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली.