पुणे: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं (Swabhimani Shetkari Sanghatana) आजचं पुण्यातील आंदोलन स्थगित करण्यात आलं आहे. (Swabhimani Shetkari Sanghatana morcha). दोन तुकड्यातील एफआरपीचा केलेला कायदा रद्द करून पुन्हा एफआरपी एकर कमी करा (lump sum FRP) या प्रमुख मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आज पुण्यात अलका चौक ते साखर संखुल पर्यंत मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी साखर आयुक्त यांच्याशी चर्चा केल्या नंतर मुख्यमंत्री यांच्याकडून ऊस प्रश्नी बैठक लावण्याचं आश्वासन दिल्या गेलं आहे. राज्यभरातून मोठ्या संख्येने ऊस उत्पादक शेतकरी मोर्चात सहभागी झाले होते.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा धडक मोर्चा आठ दिवसात बैठक लावण्याचं आश्वासन: आज साखर आयुक्तांबरोबर झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांसोबत आठ दिवसात बैठक लावण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे. तसेच काटा मारला जात असेल तर साखर कारखान्याच्या बाहेर कोणत्याही खाजगी काट्यावर केलेले वजन ग्राह्य धरले जाणार प्रशासनाने स्पष्टीकरण दिलं आहे. महाराष्ट्रात 17 आणि 18 तारखेला संपूर्ण ऊस वाहतूक आणि तोडणी बंद ठेवण्याचा राजू शेट्टी यांनी निर्णय घेतला आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा धडक मोर्चा तर मंत्र्यांचे कार्यक्रम उधळून लावणार: दोन टप्प्यातली एफ आर पी चा कायदा रद्द करून तो एक टप्प्यातला करावा यासाठी राज्य सरकारवर दबाव वाढवणार आहे. आजच्या मोर्चाच्या अनुषंगाने योग्य निर्णय घेतला नाही तर मुख्यमंत्र्यासह सर्व मंत्र्यांचे गावोगावचे कार्यक्रम उधळून लावणार असा इशारा देखील यावेळी स्वाभिमानीचे राज्य प्रवक्ते अनिल पवार यांनी दिला आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा धडक मोर्चा काय म्हणाले राजू शेट्टी? : सरकारवर टीका करताना राजू शेट्टी म्हणाले, "शेतकऱ्याला संघर्ष केल्या शिवाय काहीही मिळत नाही. साखर कारखानदाराकडून काहीही मिळत नाही. शेतकऱ्यांना लुटून पैसा हा राजकारणात वापरला जातो. त्यामुळे दरवर्षी ऊस उत्पादक शेतकऱ्याला संघर्ष हा करावाच लागतो. राज्यात सरकार हे शेतकऱ्यांवर काठी उगाळत आहे, यावरूनच या सरकारची नितीमत्ता दिसून येते. राज्यात सध्या सरकार हे सरकार प्रमाणे वागत नाही आणि विरोधक देखील विरोधकांप्रमाणे वागत नाही आहे."
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा धडक मोर्चा काय आहेत मागण्या? : मोर्चातील प्रमुख मागण्यांमध्ये, दोन तुकड्यातील एफआरपीचा केलेला कायदा रद्द करून पुन्हा एकरकमी करावे. काटामारी संपुष्टात आणण्यासाठी साखर कारखान्याचे वजनकाटे ऑनलाईन करावे. मागील वर्षाची एफआरपी + २०० रूपये तातडीने द्यावे. सर्व ऊस तोडणी कामगार तोडणी महामंडळामार्फतच साखर कारखान्यांना पुरवावेत. गतवर्षीच्या सरासरी रिकव्हरीस आधारित चालू हंगामात एक रक्कमी एफआरपी व हंगाम संपल्यानंतर ३५० रूपये उचल द्यावी. तोडणी मशिनने तुटलेल्या उसाला पालापाचोळ्याची कपात ४.५० टक्याऐवजी १.५० टक्के करावी. या मागण्याचा समावेश आहे.