महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Feb 11, 2020, 8:46 PM IST

ETV Bharat / state

'व्हॅलेन्टाईन डे'ला शेतकरी स्वाभिमानी संघटनेची पुण्यात 'प्रेम यात्रा'

सध्या सगळीकडे दूषित वातावरण आहे. महिला, मुलींवरील अत्याचार, लैंगिक शोषण वाढत आहे. अशावेळी माणसा-माणसांमध्ये प्रेम वाढावे यासाठी शेतकऱ्यांची मुले हातात गुलाबाची फुले घेऊन ही प्रेम यात्रा काढणार आहेत, असे राजू शेट्टी यांनी सांगितले.

swabhimani-shetkari-sanghatana-held-prem-yatra-in-pune-on-14-february
राजू शेट्टी पत्रकार परिषदेत बोलताना...

पुणे-'व्हॅलेंटाईन डे'च्या निमित्ताने शेतकऱ्यांच्या फुलांना अधिकची बाजारपेठ मिळावी, शिक्षणानिमित्त शहरात राहणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलांची शहरातील नागरिकांशी नाळ जुळावी, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने 'व्हॅलेंटाईन डे' ला (14 फेब्रुवारी) पुण्यातील फर्ग्युसन रस्त्यावरुन प्रेम यात्रा (परेड ऑफ लव्ह) काढण्यात येणार आहे, अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिली. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

राजू शेट्टी पत्रकार परिषदेत बोलताना...

हेही वाचा-दिल्लीत पुन्हा केजरीवाल सरकार; नागपुरात 'आप' कार्यकर्त्यांचा 500 किलो मिठाई वाटून जल्लोष

सध्या सगळीकडे दूषित वातावरण आहे. महिला, मुलींवरील अत्याचार, लैंगिक शोषण वाढत आहे. अशावेळी माणसा-माणसांमध्ये प्रेम वाढावे यासाठी शेतकऱ्यांची मुले हातात गुलाबाची फ़ुले घेऊन ही प्रेम यात्रा काढणार आहेत. या यात्रेदरम्यान शेतकऱ्यांची मुले फेरीवाला, रिक्षावाला, वाटसरू यांना गुलाबाचे फुल देतील. द्वेषामुळे माणूस दुरावतो, तर प्रेमामुळे जवळ येतो. प्रेमानेच जग जिंकता येते, असा संदेश देण्याचा प्रयत्न या रॅलीच्या निमित्ताने करण्यात येणार असल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details