महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Actress Sister Suspicious Death : अभिनेत्री भाग्यश्री मोटेच्या बहिणीचा संशयास्पद मृत्यू; चेहऱ्यावर आढळल्या जखमा - अभिनेत्रीच्या बहिणीचा संश्यास्पद मृत्यू

देवयानी फेम अभिनेत्री भाग्यश्री मोटेच्या बहिणीचा संशयास्पद मृत्यू झाला असून, याप्रकरणी नातेवाईकांनी घातपाताची शक्यता वर्तवली आहे. मधू मार्कंडे अस मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. तिच्या चेहऱ्यावर काही जखमा आढळल्या आहेत. घटनेचा अधिक तपास वाकड पोलीस करत आहेत.

Death of Madhu Markandeya
Death of Madhu Markandeya

By

Published : Mar 13, 2023, 5:54 PM IST

Updated : Mar 13, 2023, 6:50 PM IST

पिंपरी- चिंचवड : मधू मार्कंडे आणि भाग्यश्री मोटे या बहिणी आहेत. मधू ही केक बनवण्याचा व्यवसाय वाकड परिसरात करते, सोबत तिची मैत्रीण देखील राहते. रविवारी मधू तिच्या मैत्रिणीसह भाड्याची खोली बघण्यासाठी गेली होती.

अचानक चक्कर आली - रूम बघून झाल्यानंतर अचानक मधूला चक्कर येऊन दातखिळी बसली होती. त्यामुळे तिला तातडीने सोबत असलेल्या मैत्रिणीने खासगी रुग्णालयात दाखल केले. तिथे उपचार होऊ न शकल्याने महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात घेऊन जाण्यात आले, तिथे तपासल्यानंतर मधूला मृत घोषीत करण्यात आलं. या घटने प्रकरणी मधूचा मृत्यू संशयास्पद असून, तिचा घातपात झाल्याचा संशय नातेवाईकाकडून व्यक्त केला जातो आहे. वाकड पोलिसांनी याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, अधिक तपास पोलिस करत आहेत. दरम्यान, या घटनेने पुण्यात खळबळ उडाली आहे.

नातेवाईकांचा संशय - मधूचा मृत्यू हा नैसर्गिकरित्या झालेला नाही. यामागे घातापातची शक्यता मधूच्या नातेवाईकांनी व्यक्त केली. मधूच्या चेहऱ्यावर अनेक जखमा आढळून आल्या आहेत. त्यामुळे तिचा मृत्यू संशयास्पद असल्याचे नातेवाईकांनी सांगितले. आता या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

पोलीस तपास सुरू - अभिनेत्री भाग्यश्री मोटेच्या बहिणीचा संशयास्पद मृत्यू झाल्याने पुण्यात खळबळ उडाली आहे. ही घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडली आहे. चक्कर आल्याने अचानक कसा मृत्यू होऊ शकतो, असा सवाल मधू यांच्या नातेवाईकांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे आता या प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे. मधूच्या चेहऱ्यावर जखमा आढळल्याने घातपाताचाही संशय नाकारता येत नाही. त्यामुळे पोलीस आता कसून तपास करत आहेत.

भाग्यश्री कोण आहे -भाग्यश्री हिने देवश्री गणेश मालिकेत काम केले. यात तिने देवी पार्वतीची भूमिका साकारली होती. भाग्यश्रीने मराठी सिनेमांमध्ये काम केले आहे. वर्ष २०११ मध्ये शोधू कुठे या मराठी सिनेमातून तिने सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. याबरोबरच भाग्यश्रीने तेलगू सिनेमातही काम केले आहे.

Last Updated : Mar 13, 2023, 6:50 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details