पुणे : राज्यात शिंदे फडवणीस सरकार ( Shinde Fadwanis Government ) आल्यानंतर, जिल्हा नियोजन समितीच्या ( District Planning Committee) कामाला आधीच्या सरकारने दिलेली मान्यता, जशीच्या तशी न देता तपासण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या होत्या. त्यामुळे आधीच्या सरकारच्या कामांना हे सरकार स्थगिती देत आहे. विकासात अडथळा आणत आहे. अशी टीका सर्व विरोधी पक्षाकडून केली जात होती.
अजित पवार यांनी सुचवलेल्या कामांना कात्री : पुण्याच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांतदादा पाटील यांची नियुक्ती झाल्यानंतर त्याने सर्वच कामांना स्थगिती दिली जाणार नाही असे म्हटले होते. बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित जिल्हा नियोजन समितीच्या कामांना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी मान्यता दिली. त्यात माजी पालकमंत्री अजित पवार यांनी सुचवलेल्या कामांना कात्री लावण्यात आली आहे. यावरून पुन्हा एकदा चंद्रकांत पाटील विरुद्ध अजित पवार असा वाद रंगण्याची शक्यता आहे. अजित पवार पालकमंत्री असताना त्यांनी जिल्हा नियोजन समितीच्या एकूण निधीपैकी 40 टक्के निधी एकट्या बारामती तालुक्याला दिला होता. त्यात बारामतीतील रस्ते नगरपालिकेची इमारत कालव्याची कामे, यांचा समावेश होता. बारामती २४५ कोटीच्या कामांना चंद्रकांत दादा पाटील यांनी पालकमंत्री म्हणून स्थगिती दिलेली आहे.