पुणे : मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक ( Slap on Chandrakant Patil ) केल्यानंतर अकरा पोलिसांचे निलंबन ( Suspension of eleven policemen ) करण्यात आले होते. त्यानंतर राज्यातील सर्व स्तरातून त्यावर टीका होत होती. यातून पोलिसांची काय चूक असा प्रश्नही निर्माण करण्यात आला होता. त्यानंतर स्वतः चंद्रकांत पाटीलने सुद्धा मुख्यमंत्र्यांना निर्णय घ्या असे विनंती केली होती. परंतु प्रशासनाचे काम आहे ते करू द्या असे त्यांनी मला सांगितले होते असे म्हटले होते.
Ink thrown case : शाईफेक प्रकरणातील 11 पोलिसांचे निलंबन रद्द; राज ठाकरेंच्या मध्यस्थीनंतर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचा होकार - case After mediation of Raj Thackeray
मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक ( Slap on Chandrakant Patil ) केल्यानंतर अकरा पोलिसांचे निलंबन ( Suspension of eleven policemen ) करण्यात आले होते. पिंपरी चिंचवड येथील शाईफेक प्रकरणी राज ठाकरे स्वतः चंद्रकांत पाटील यांच्याशी बोलले त्याचप्रमाणे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी त्यांचे बोलणे झाले आहे.

307 कलम शिथिल करण्याची तयारी :पिंपरी चिंचवड येथील शाईफेक प्रकरणी राज ठाकरे स्वतः चंद्रकांत पाटील यांच्याशी बोलले त्याचप्रमाणे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी त्यांचे बोलणे झाले आहे. 307 कलम शिथिल करण्याची तयारी चंद्रकांत पाटील यांनी दाखवले आहेत. त्याचप्रमाणे पोलिसांचा निलंबन मागे घेऊन त्यांना तात्काळ सेवेत घ्यायचे अशी विनंती राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना केली ज्याला त्यांनी तात्काळ होकार दिला आहे
राज ठाकरे यांची सर्वपक्षीय नेत्यांनी घेतली भेट :पुण्यामध्ये राज ठाकरे यांची पिंपरी चिंचवड मधील सर्वपक्षीय नेत्यांनी भेट घेतली. त्यानंतर हा विषय चर्चेला आला त्याचवेळी त्यांनी ताबडतोब मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना ही कळवले आणि त्यांनी सुद्धा होकार दिला असल्याची माहिती देण्यात आली आहे. अकरा पोलिसांचे निलंबन झाल्यामुळे पोलीस दलामध्ये सुद्धा मोठी नाराजी होती आणि ती नाराजी दूर करण्याचा प्रयत्न राज ठाकरे यांनी केला आणि त्याला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची नाराजी कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे असे दिसत आहे.