पुणे -बिबट्याची शिकार झाल्याची धक्कादायक घटना मध्यरात्रीच्या सुमारास आंबेगाव तालुक्यातील शिंगवे पारगाव येथील एका माळरानावरील शेतात घडली आहे. अंदाजे नऊ महिन्याच्या बिबट्याच्या मानेवर गंभीर जखम झाल्याने मृत्यू झाला. मात्र, त्याच्यावर कोणी हल्ला केला हे अद्यापही अस्पष्ट आहे. मात्र, बिबट्याची शिकार झाल्याचे बोलले जात आहे.
आंबेगावमध्ये बिबट्याची शिकार? वनविभाग घटनास्थळी दाखल हेही वाचा - मनमाडमध्ये टँकरमधून पेट्रोल-डिझेल काढणारे दोघे रंगेहात ताब्यात
गेल्या अनेक दिवसांपासून शिरूर, आंबेगाव, जुन्नर, खेड तालुक्यात ऊसशेतीलगतबिबट्याचे मोठ्या संख्येने वास्तव्यआहे. हा बिबट रात्रीच्या सुमारास शिकारीच्या शोधात बाहेर पडून शिकार करत असतो. मात्र, आज बिबट्याचा मृतदेह सापडला. वनविभागाला माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. बिबट्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात येणार असून त्यानंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
ऊसशेतीलगत बिबट्याचे वाढते वास्तव्य शेतकऱ्यांसाठी दिवसेंदिवस धोकादायक बनत चालले आहे. अंधाराच्या वेळी शेतीकडे जात असताना कधी कोठून हल्ला होईल या भीतीमुळे शेतकरी अंधारात घराबाहेरही पडत नाही.
हेही वाचा - भंडारा : अल्पवयीन मुलीच्या मृत्यूप्रकरणी दोन पोलीस निरीक्षक अन् एक जमादार निलंबित