पुणे : शिवसेनेच्या फायर ब्रिगेड नेत्या सुषमा अंधारे यांचे विभक्त झालेली पती यांनी शिंदे गटात प्रवेश केला आणि यापुढे सुषमा अंधारे कोण ( Sushma Andharen divorce husband joins Shinde Group ) आहेत. त्यांचे काम काय हे सर्व महाराष्ट्रासमोर आणणार असल्याचे म्हटले. त्यामुळे सुषमा अंधारेंबद्दल उत्सुकता महाराष्ट्रात निर्माण झाली. त्यावर सुषमा अंधारेंनी त्यांच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
सुषमा अंधारेंची भावनिक पोस्ट :त्यानंतर मात्र सुषमा अंधारे भावनिक होत आपल्या मुलीचा फोटो शेअर करत एक भावनिक पोस्ट फेसबुकवर केलेली आहे. जर तुम्ही ऐकत नसेल तर अगोदर तुमच्या समाजात तुमचे लोक फोडले जातील. भवतालच वातावरण खराब केले जाईल. नाहीतर मग घरात काहीतरी माणसं तोडली जातील. नाहीतर ऐकतच नसेल तर तुमच्या चरित्रावर संशय निर्माण करतील अशी फेसबुक पोस्ट त्यांनी केली( Sushma Andhare Emotional Post) आहे.
सुषमा अंधारे बॅक फुटला येणार का :त्यामुळे सुषमा अंधारे बॅक फुटला येतात का काय ?अशी चर्चा महाराष्ट्रात सुरू होती. सुषमा अंधारे पत्रकार परिषद घेत जे काही वार होतील ते आम्ही परत लावण्यासाठी सक्षम आहोत असे सांगितले. त्यांचे विभक्त झालेले पती यांनी मात्र यापुढे सुषमा अंधारे यांचे सगळे करारनामे मी जळगावमध्ये सांगेन. असे सांगून ,एक प्रकारे सुषमा अंधारे यांनाच कोंडीत पकडण्याचा प्रयत्न शिंदे गटाकडून केला जात असल्याचे बोलले जात आहे. सुषमा अंधारे यांच्या पतीने तुम्ही स्वतःच्या मुलीला तरी दूध पाजवलं का? असं म्हणत गंभीर आरोप त्यांच्यावर केलेला आहे. त्यानंतर आता त्यांची फेसबुक पोस्ट पुढे आलेली आहे.
बाबासाहेबांच्या 125 व्या जयंतीनिमित्त दुबईत व्याख्यान :सुषमा अंधारे यांनी या पोस्टमध्ये आपल्या मुलीला म्हटले ( Sushma Andhare Facebook Post ) आहे. प्रिय कबू तू 45 दिवसांची होतीस तेव्हाचा हा फोटो आहे. मला एक दिवसासाठी दुबईला जावे लागणार होते. बाबासाहेबांच्या 125 व्या जयंतीनिमित्त व्याख्यानासाठी दुबईला जायचे होते. आणि तुझा पासपोर्ट तयार नव्हता त्यावेळेस संपूर्ण कुटुंब विशेष ते तुझा मामा माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला. निमित्त दुबईला गेले दुबईचे दोन तासाचा व्याख्यान संपवून मी घारीसारखे पटकन तुझ्याजवळ आली अशी या पत्राची सुरुवात असून तुझ्या आईने जुन्या मळवाट्याने जायचे नाकारले. आणि नवीन पायवाट घडवायची ठरवले आहे. यात बऱ्याचदा पाय रक्ताळणार आहेत . बेहत्तर पण तुझ्या आईने लढायचे ठरवले आहे. त्यातलं तुला किती कळेल माहित नाही असे म्हणल आहे.