महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पतीने पेटवून घ्यायला पोलीस जबाबदार, सुरेश पिंगळेंच्या पत्नीचे गंभीर आरोप - पुणे पोलीस आयुक्तालय

पुण्यात काल सुरेळ पिंगळे या व्यक्तिने स्वतः जाळून घेण्याचा प्रयत्न केला. तर, पिंगळेंच्या पत्नी शामला यांनी या घटनेला पुण्यातील पोलीस आयुक्तालयाला जबाबदार धरले आहे. वाचा सविस्तर...

पुणे
पुणे

By

Published : Aug 19, 2021, 3:33 AM IST

पुणे -पुणे पोलीस आयुक्तालयाच्या प्रवेशद्वारावर काल (18 ऑगस्ट) सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास सुरेश पिंगळे (वय 40 वर्षे) या व्यक्तीने स्वतःच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून जाळून घेतले. यामध्ये गंभीररीत्या भाजलेल्या सुरेश पिंगळे यांच्यावर सुर्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. दरम्यान या प्रकरणात आता सुरेश पिंगळे यांच्या पत्नीने पोलिसांवर आरोप केले आहेत.

सुरेश पिंगळेंच्या पत्नीचे पोलिसांवर गंभीर आरोप

पोलिसांचा हलगर्जीपणा जबाबदार - शामला पिंगळे

'नोकरीसाठी पोलीस व्हेरिफिकेशन आवश्यक आहे. त्यासाठी पोलीस आयुक्तालयात असलेल्या व्हेरिफिकेशन कार्यालयात वारंवार चकरा मारूनही पोलीस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट मिळाले नाही. त्यामुळेच सुरेश पिंगळे यांनी जाळून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला', असे त्यांच्या पत्नी शामला पिंगळे यांनी म्हटले आहे.

हेही वाचा -आयुष्य खूप सुंदर आहे, पण माझ्या आयुष्यात त्रास आहे; फेसबुक पोस्ट करून छावा संघटनेच्या तालुकाध्यक्षाची एसटीखाली आत्महत्या

ABOUT THE AUTHOR

...view details