महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Dec 19, 2019, 9:37 PM IST

ETV Bharat / state

खासदार सुप्रिया सुळेंची बारामती रेल्वे स्थानकाला भेट; विकासकामांची केली पाहणी

बारामती रेल्वे स्थानकात अत्याधुनिक सोयीसुविधा मिळाव्यात, यासाठी मागील अनेक दिवसांपासून सुप्रिया सुळे पाठपुरावा करत आहेत. या पार्श्वभूमीवर झालेल्या कामाची पाहणी करण्यासाठी सुप्रिया सुळे बारामती रेल्वे स्थानकात आल्या होत्या.

pune
खासदार सुप्रिया सुळे

पुणे- मुंबई रेल्वे ही लाखो मुंबईकरांची 'लाईफ-लाईन' आहे. मुंबईतील कित्येक महिला, पुरुष आणि विद्यार्थी नोकरी व शिक्षणानिमित्त रेल्वेमधून ये-जा करतात. असे असताना मुंबईत मेट्रो ट्रेनची खरच गरज आहे का? असा प्रश्न उपस्थित करून खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबई मेट्रो ट्रेनचा सर्व निधी हा रेल्वेला देण्यात यावा, अशी आमची सर्वांची मागणी असल्याचे म्हटले आहे.

प्रतिक्रिया देताना खासदार सुप्रिया सुळे

बारामती रेल्वे स्थानकात अत्याधुनिक सोयीसुविधा मिळाव्यात यासाठी मागील अनेक दिवसांपासून सुप्रिया सुळे पाठपुरावा करत आहेत. या पार्श्वभूमीवर झालेल्या कामाची पाहणी करण्यासाठी त्या बारामती रेल्वे स्थानकात आल्या होत्या. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. जेजुरी रेल्वे स्थानकाच्या धर्तीवर बारामती रेल्वे स्थानकाचा विकास व्हावा, अशी अपेक्षा बारामतीकरांची असून त्यासाठी मी खास प्रयत्न करत आहे. आगामी काळात बारामती रेल्वे स्थानकाचा मोठा कायापालट होणार आहे. बारामतीत होणाऱ्या अत्याधुनिक रेल्वे स्थानकाची रचना ही बारामतीकरांनी करावी, अशी माझी अपेक्षा असल्याचे खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.

विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठी हल्ल्याची चौकशी व्हावी

देशाच्या राजधानीत महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनींवर झालेल्या लाठीचार्जबाबत सुप्रिया सुळे यांनी निषेध व्यक्त केला. ज्या वाचनालयात मुले वाचन करतात त्या ठिकाणी जाऊन मुलांवर लाठीचार्ज केल्या गेल्याचा त्यांनी निषेध केला. महाराष्ट्रातील आणि देशातील जनतेला आज शांततेची गरज आहे. निवडणुका येतील-जातील. मात्र, यासंदर्भात गृहमंत्रालयाने लक्ष घालावे. मुला-मुलींवर झालेल्या लाठी चार्जबाबत चौकशी व्हावी, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली.

हेही वाचा-पिंपरी चिंचवडमधील ३०० पेक्षा जास्त महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी पाहिला 'मर्दानी २'

ABOUT THE AUTHOR

...view details