महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मोदी सरकारमुळे अर्थव्यवस्था कोलमडली...कठोर टीका करत सुप्रिया सुळेंचा अर्ज दाखल - loksabha

. देशात बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या वाढल्या असून अर्थव्यवस्था कोलमडली आहे. मात्र, मोदी आणि इतर सत्ताधारी व्यक्तिगत पातळीवर टीका करत आहेत. पण, इतर कोणी व्यक्तिगत टीका करत असले तरी आम्ही अशी टीका करणार नाही, असे त्या म्हणाल्या.

खासदार सुप्रिया सुळे

By

Published : Apr 3, 2019, 2:06 PM IST

पुणे - राज्यातील लक्षवेधी लढत असलेल्या बारामती मतदारसंघात सुप्रिया सुळे यांनी बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. पुण्यातल्या कौन्सिल हॉल येथील विभागीय आयुक्त कार्यालयात सुप्रिया सुळे यांनी आघाडीकडून अर्ज भरला. आघाडीकडून अर्ज भरण्यापूर्वी जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले. यावेळी सुप्रिया सुळे यांनी भाजप सरकारवर कठोर शब्दात टीका केली.

मोदी व्यक्तीगत टीका करतायत, मात्र आम्ही करणार नाही असे सुप्रिया म्हणाल्या

नरपतगिरी चौकात आघाडीची ही सभा झाली. यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या, की नोटबंदीने सर्वसामान्य जनतेच्या कष्टात वाढ झाली. देशात बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या वाढल्या असून अर्थव्यवस्था कोलमडली आहे. मात्र, मोदी आणि इतर सत्ताधारी व्यक्तिगत पातळीवर टीका करत आहेत. पण, इतर कोणी व्यक्तिगत टीका करत असले तरी आम्ही अशी टीका करणार नाही, असे त्या म्हणाल्या.

बारामती मतदारसंघात आव्हान उभे राहिले असल्याचे विचारले असता, ही कठीण परीक्षा समजत नाही. आपण आपला अभ्यास करत राहायचे, अशी प्रतिक्रिया सुळेंनी दिली. इंदापूर तसेच बारामती मतदारसंघात काँग्रेस पक्षाकडून आपल्याला भरपूर सहकार्य मिळत असल्याचे सुप्रिया यांनी सांगितले. एकजुटीने काम करून विजयी होऊ, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

अर्ज दाखल करताना आघाडीचे नेते दिलीप वळसे पाटील, हर्षवर्धन पाटील यांच्यासह काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप तसेच अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. त्याचबरोबर सुळे यांचे पती सदानंद सुळे, मुलगी रेवती आणि बहीण नीता पाटील देखील हजर होत्या.

ABOUT THE AUTHOR

...view details