पुणे - पुणे-सातारा महामार्गावरील खेड-शिवापूर टोलनाक्याचा कारभार अतिशय विस्कळीत आहे. त्यामुळे येथे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. अपुऱ्या रस्त्यामुळे या परिसरात लहान-मोठे अपघात होऊन ८५० जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जनभावना लक्षात घेऊन हा टोलनाका बंद करावा अशी मागणी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांना केली आहे.
खेड-शिवापूर टोलनाका बंद करावा, सुप्रिया सुळेंची गडकरींना विनंती
पुणे-सातारा महामार्गावरील खेड-शिवापूर टोलनाक्याचा कारभार अतिशय विस्कळीत आहे. त्यामुळे येथे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. त्यामुळे जनभावना लक्षात घेऊन हा टोलनाका बंद करावा अशी मागणी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांना केली आहे.
सध्या खेड-शिवापूर टोलनाक्याचा कारभार अतिशय विस्कळीत आहे. तसेच या परिसरातील रस्ताही गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला आहे. त्यामुळे येथे अपघात होऊन अनेकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे वस्तुस्थिती लक्षात घेता हा टोलनाका बंद करावा अशी मागणी विविध संघटना करीत आहेत. शिवापूर टोलनाका कृती समितीने याबाबत नुकतेच एक निवेदन सुप्रिया सुळेंना दिले आहे. तसेच स्थानिकांनी या टोलनाक्याला सातत्याने विरोध दर्शविला असल्याचे सुळे म्हणाल्या.
लोकांची भावना समजून घेऊन हा टोलनाका बंद व्हावा, अशी विनंती खासदार सुप्रिया सुळेंनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना केली आहे. तसेच आपण या मागणीचा विचार करुन संबंधित यंत्रणांना हा टोलनाका बंद करण्याचे आदेश द्यावेत असेही सुळे यांनी गडकरींना म्हटले आहे.