महाराष्ट्र

maharashtra

Supriya Sule Reaction : विजय शिवतारे यांच्या आरोपावर सुप्रिया सुळे म्हणाल्या...

By

Published : Mar 6, 2023, 2:51 PM IST

बारामती लोकसभा मतदार संघातील खासदार सुप्रिया सुळे हे दर आठवड्याच्या शनिवारी आणि रविवारी त्यांच्या मतदार संघात दौरा आयोजित करत असतात. रविवारी झालेल्या त्यांच्या दौऱ्यावर शिवसेना शिंदे गटाचे माजी मंत्री विजय शिवतारे यांनी गंभीर आरोप केले आहे. त्यांनी त्यांच्या फेसबुक वर पोस्ट करत हे आरोप केले आहे.

MP Supriya Sule
खासदार सुप्रिया सुळे

विजय शिवतारे यांच्या आरोपावर सुप्रिया सुळे म्हणाल्या...

पुणे: माजी मंत्री विजय शिवतारे यांनी त्यांच्या फेसबुकवर खासदार सुप्रिया सुळे यांचा एक व्हिडिओ आणि पोस्ट शेअर केले आहे. सुळे यांनी मटण खाऊन देवदर्शन घेतल्याचा त्यांच्यावर आरोप केला आहे. शिवसेनेचे माजी आमदार विजय शिवतारे यांनी हा गंभीर आरोप केला आहे. यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, माझ्या वाचनात काहीच आलेले नाही. मला माहित नाही या संपूर्ण भागात महागाई, बेरोजगारी, आणि पाण्याचा प्रश्न हा किती गंभीर झाला आहे. हे आपल्याला माहीत आहे. मी सकाळपासूनच याच्या मागे आहे.



मटण खातानाचा व्हिडीओ शेअर: शिवतारे यांनी सुप्रिया सुळे यांचा मटण खातानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात ते म्हणाले की आधी मटण खाल्लं. मग भैरवनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतले. महादेव मंदिरात गेल्या. त्यांनंतर दिवे घाट ओलांडून सासवडला गेल्या. सासवडला संत सोपानकाकांचे दर्शन घेतले. येणेवरे ज्ञान देवो सुखिया जाहला अशी खोचक टीका शिवतारे यांनी केली आहे. मटण खावून देव दर्शनाला जायचे यावर त्या म्हणाले की, माझा अभ्यास या विषयावर खूपच कमी आहे. तुम्ही जर पाण्यावर, बेरोजगारीवर तसेच आजच्या अर्थव्यवस्थेवर मला प्रश्न विचारले तर मी त्यावर सांगेल. पण माझे यावरचा अभ्यास खूपच कमी आहे. असे देखील यावेळी सुळे म्हणाले.



रेशन दुकान बंद: काल काही लोक मला भेटायला आले होते. त्यांचे म्हणणे आहे की, महाराष्ट्र सरकारने रेशन दुकान बंद करण्याचा एक ट्रायल बेसेस वर करत आहे. विदर्भ महाराष्ट्र या भागात काही रेशन दुकान बंद करून डायरेक्ट त्यांच्या खात्यात निधी जाणार आहे. जे रेशन भेटणार होते ते बंद होणार आहे. हे जर असे झाले तर काय होणार. गरीब माणसाने कसे जगायचे असे अनेक प्रश्न उभे राहणार आहे. असे जीआर कश्यासाठी सरकारने काढल आहे. या मागचा षडयंत्र काय आहे. हे उघड झाले पाहिजे. अस देखील यावेळी सुप्रिया सुळे म्हणाले. तसेच जर रेशन बंद झाले तर फूड कॉर्पोरेशन काय करणार. मिनिमाम सपोर्ट प्राईस हा देखील प्रश्न उपस्थितीत होणार आहे. तसेच लोकसभेत आम्ही ८० कोटी लोकांना अन्न देतो असे म्हणता मग आता या लोकांचे काय करणार असे देखील यावेळी सुळे म्हणाले.



देशाला विकासाची गरज आहे: कसबा पोट निवडणुकीवर सुळे यांना सांगितले की, मी राज्याचे तसेच पुणेकर जनतेचे आभार मानते. त्यांनी भाजपच्या अश्या प्रचाराला थंबस डाऊन हे पुणेकर नागरिकांनी केले आहे. माझी सगळ्या पक्षांना विनंती आहे की, आत्ता विकासाच्या मुद्द्यावर येणाऱ्या निवडणुका या व्हायला पाहिजे. देशाला विकासाची गरज आहे. असे देखील यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या.



यावर चर्चा व्हायला पाहिजे: केंद्रीय यंत्रणेच्या गैरवापर बाबत विविध पक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. सगळ्या विरोधी पक्षाच्या भावना एका पत्राद्वारे मोदी यांच्या पर्यंत पोहचवला असतील तर अर्थात या देशात काय परिस्थितीती आहे. यावर चर्चा व्हायला पाहिजे.आमची केंद्राला विनंती आहे की, पार्लमेंटमध्ये महागाईची चर्चा व्हायला पाहिजे. गॅस दरवाढ बरोबर महागाई आणि बेरोजगारी या विषयाबद्दल आम्ही बोलत आहोत.आपले निर्यात कमी झाली आहे. देशात कांद्याला भाव नाही. पॉलिसी लेवलवर काय काम करत आहे. सरकार यावर चर्चा व्हायला पाहिजे. असे देखील यावेळी सुळे म्हणाले.

हेही वाचा: Supriya Sule On Inflation महागाईवरून सुप्रिया सुळे आक्रमक बेरोजगारीवरुन मोदींवर टीकेची झोड

ABOUT THE AUTHOR

...view details