पुणे- राष्ट्रवादीमध्ये गेल्या 15 वर्षात त्रास झाला हे खासदार उदयनराजे यांना आज कळाले याचे आश्चर्य वाटते. मात्र त्रास होत असल्याचे मागील 15 वर्षात ते कधी बोलले नाहीत, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधून उदयनराजे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांनी राष्ट्रवादीवर केलेल्या टीकेला उत्तर देताना त्या बोलत होत्या.
उदयनराजेंना राष्ट्रवादीत त्रास होत असल्याचे 15 वर्षानंतर आत्ता कळले - सुप्रिया सुळे - supriya sule byte
गेल्या 15 वर्षात त्रास झाला हे खासदार उदयनराजे यांना आज कळाले याचे आश्चर्य वाटते. मात्र त्रास होत असल्याचे मागील 15 वर्षात ते कधी बोलले नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.
खासदार सुप्रिया सुळे
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, उदयनराजे भाजपमध्ये गेले आहेत त्यांना शुभेच्छा आहे. लोकसभेत ते चांगले कामे करतील अशी खात्री आहे. तसेच अनेक नेते राष्ट्रवादीतून जात आहेत, यावर बोलताना त्यांना ईडीची, बँका, सहकारी संस्था याबाबतची भिती दाखवल्या जात आहे. त्यामुळे लोक आम्हाला हे खासगीत सांगतात, असेही त्या म्हणाल्या.