महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सुप्रिया सुळेंकडून उमेदवारी अर्ज दाखल ; जाहीर केली संपत्ती - supriya

शपथ पत्रात जाहीर करण्यात आलेल्या माहिती प्रमाणे, सुळे यांच्याकडे जंगम मालमत्ता २१ कोटी २६ लाख ९३ हजार ९५५ रुपये एवढी आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे

By

Published : Apr 4, 2019, 5:12 AM IST

पुणे - संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्या बारामती लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्याकडून देण्यात आलेल्या शपथ पत्रावर संपत्तीचा तपशील देण्यात आला. सुप्रिया सुळेंच्या संपत्तीत पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे


शपथ पत्रात जाहीर करण्यात आलेल्या माहिती प्रमाणे, सुळे यांच्याकडे जंगम मालमत्ता २१ कोटी २६ लाख ९३ हजार ९५५ रुपये एवढी आहे. तर स्थावर मालमत्ता १८ कोटी ४० लाख ३९ हजार इतकी आहे. सोबतच ५५ लाखाचे कर्ज आहे. तर त्यांचे पती सदानंद सुळे यांची मालमत्ता ८३ कोटी ९३ लाख २५ हजार ५२७ रुपये एवढी आहे. सदानंद सुळे हे व्यावसायिक आहेत. सुप्रिया सुळे यांना दोन मुले आहेत.


मुलगी रेवती आणि मुलगा विजय हे दोघेही अजून पालकांवर अवलंबून असले तरी कोट्यधीश असल्याचे शपथपत्रात नमूद करण्यात आले आहे. सुप्रिया सुळे यांची मुलगी रेवती तिच्या नावावर ८ कोटी ९२ लाख ८ हजार १४५ रुपये आहेत. तर मुलगा विजय याच्या नावावर ४ कोटी १८ लाख १३ हजार ४४९ रुपये आहे.


सुप्रिया सुळे यांची स्वतःची परदेशात गुंतवणूक नाही. मात्र, त्यांचे पती सदानंद सुळे यांची परदेशात गुंतवणूक आहे. कोट्यधीश असलेल्या सुप्रिया सुळे यांच्याकडे सध्या हातातील रोख रक्कम २८ हजार ७७० रुपये एवढीच आहे. सुप्रिया सुळे यांच्या नावावर दीड लाख रुपयांचे दागिने आहेत. तर त्यांची शेअर्समधील आणि म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही ७ कोटी ७७ लाख ३१० रुपये एवढी आहे.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details