महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

तुमच्या पुढं विरोधकच नाहीत, तर केंद्रीय मंत्र्यांची फौज कशासाठी उतरवले - सुप्रिया सुळे - Indapur Assembly Constituency

खासदार सुप्रिया सुळे यांची दत्तात्रय भरणे यांच्या प्रचारासाठी सभा झाली. या सभेत त्यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली.

खासदार सुप्रिया सुळे

By

Published : Oct 14, 2019, 10:06 PM IST

पुणे -मुख्यमंत्री म्हणतात विरोधकच नाहीत, मगं प्रचारासाठी पंतप्रधान, मंत्री कशासाठी असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळें यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला. जेवढे विरोधक येत आहेत तेवढी आमची मते वाढताहेत, असे सुळे म्हणाल्या. इंदापूर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार दत्तात्रय भरणे यांच्या प्रचारासाठी खासदार सुप्रिया सुळे यांची सभा पार पडली, त्यावेळी त्या बोलत होत्या.

खासदार सुप्रिया सुळे

आपल्या भाषणात त्यांनी युती सरकारवर जोरदार टीका केली. दरम्यान निमगांव केतकीत महायुतीचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांच्या प्रचारासाठी केंद्रीय मनुष्यबळ मंत्री स्मृती इराणी या येणार आहेत. त्या प्रचारासाठी येत असल्याचे आपल्याला बातम्या मधून समजले असे सांगत जर मुख्यमंत्री म्हणतात आमच्यासमोर विरोधकच नाहीत तर मग विरोधक नसताना दिल्ली तसेच बाहेरच्या राज्यातील मंत्री येऊन प्रचार का करत आहेत, असा सवाल सुळे यांनी उपस्थित केला.

ABOUT THE AUTHOR

...view details