पुणे : खासदार सुप्रिया सुळे पवार म्हणाल्या की, सत्ताधारी पक्षाचा आमदार मंत्री जर दगड मारण्याची भाषा करत असतील, तर ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. याबद्दल देवेंद्र फडवणीस यांच्याकडून गृहमंत्री म्हणून सुद्धा मला जास्त अपेक्षा नाही. परंतु महाराष्ट्राची कायदा व्यवस्था किती बिघडली आहे, हे याचे उदाहरण असल्याची टिका सुप्रिया सुळे यांनी केलेली आहे. याबाबत मी गृहमंत्री अमित शाह यांना संसदेमध्ये भेटेल. याची चर्चा करणार आहे. कारण देवेंद्र फडवणीस यांच्याकडून जास्त अपेक्षा करण्याची मला गरज सध्या वाटत नाही. परंतु मी त्यांनाही एक वेळ बोलेल, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
काल्पनिक गोष्टी रंगवण्यात अर्थ नाही :त्याचबरोबर राज्यात अजित पवार मुख्यमंत्री होणार का? या प्रश्नावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, की या संदर्भामध्ये अनेक काल्पनिक गोष्टी बोलल्या जातात. राजकारण हे काल्पनिक नसून ते वास्तव असते. त्यामुळे आमच्या पक्षाचे लोक आमचे प्रवक्ते याविषयी जास्त बोलतील, असे स्वतः अजित पवार यांनी सांगितलेले आहे. त्यामुळे अशा गॉसिप करण्यात काहीही अर्थ नाही. राज्यापुढे अनेक प्रश्न आहेत. मी माझ्या लोकसभा मतदारसंघांमध्ये खूप व्यस्त असल्यामुळे याचा विचार करायची मला गरज नाही. पण योग्य वेळ आल्यानंतर आम्ही सर्वजण याविषयी बोलू. पण आता विनाकारण काल्पनिक गोष्टी रंगवण्यात अर्थ नाही. त्या रंगवल्या जात आहेत, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिलेली आहे.