महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Supriya sule on fadanvis : . छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेण्याचा आता भाजपला अधिकार नाही-सुप्रिया सुळे - Supriya Sule criticize on fadanvis

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ( Governor Bhagat Singh Koshyari ) यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज जुन्या काळातील आदर्श असल्याचे विधान राज्यपाल यांनी केला आहे

Supriya sule on fadanvis
खासदार सुप्रिया सुळे

By

Published : Nov 21, 2022, 1:52 PM IST

पुणे :राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ( Governor Bhagat Singh Koshyari ) यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज जुन्या काळातील आदर्श असल्याचे विधान राज्यपाल यांनी केला आहे. यावरून राज्यात मोठा वाद निर्माण झालेला आहे. विरोधी पक्ष तसेच विविध सामाजिक संघटनेच्यावतीने राज्यपाल यांच्या विरोधात आंदोलन केले जाते आहे. राज्यपाल यांच्या वक्तव्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Deputy Chief Minister of state Devendra Fadnavis ) यांनी काल वक्तव्य करत सारवासारव केली आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी टीका केली आहे. त्या म्हणाले की आम्ही केले तर चूक असते त्यांनी केले की मनात तसे काहीही नसतो. दिल्लीवरून कोणाचा फोन आला असेल. मला माहित नाही पण त्यांना बाहेर येऊन डेफिनच करावा लागणार होत. पण हे दुर्दैवी आहे की देवेंद्र जी आपसे ये उम्मीद ना थी..माझी त्यांच्याकडून जास्त अपेक्षा होती. कारण ते याआधी राज्याचे मुख्यमंत्री होते. छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेण्याचा आता यापुढे भारतीय जनता पक्षाला अधिकार नाही ( Bharatiya Janata Party has no authority ), असे यावेळी सुळे म्हणाल्या.


महामहीम राज्यपाल यांच्यावर टीका करू नये : पुण्यात आज खासदार सुप्रिया सुळे यांनी नवले ब्रीज येथे झालेल्या अपघाताची पाहणी केली.यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्यपाल यांनी केलेल्या वक्तव्यावर सुळे यांना विचारले असता ते म्हणाले की महामहीम राज्यपाल यांच्यावर टीका करू नये हे आपली संस्कृती आहे. पण दुर्दैवाने राज्यपाल हे सातत्याने महापुरुषांबाबत वक्तव्य करत आहे. राज्यात या आधी खूप राज्यपाल होऊन गेले. ज्यांनी या राज्याला दिशा दिली आहे. राज्यपाल हे परत परत चूक करत आहेत. याचा अर्थ त्यांच्याकडून जाणूनबुजून केलं जातं आहे. यामुळे राज्याची सातत्याने बदनामी होत आहे, असे यावेळी सुळे म्हणाले.

खासदार सुप्रिया सुळे


भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी त्यांच्यावर टीका : काल पिंपरी चिंचवड येथे खासदार सुप्रिया सुळे यांनी महिला पत्रकार यांनी साडी घालावी, भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. यावर सुळे यांना विचारले असता ते म्हणाले की माझे भाषण नीट ऐका थोडा वेळ पाहून ऐका त्यात मी काय म्हटले, टीका करण्याचा अधिकार सर्वाना ते करत आहेत. माझी आई नेहेमी म्हणत असते.निंदकाचे घर असावे शेजारी त्यामुळे त्यांनी टीका करावी. आमच्या विरोधकांनी आमच्यावर टीका केली यात काही गैर नाही. जर माझं पस्तीस मिनिटांचा भाषण विरोधक सतरा सेकंदात सांगत असेल तर त्यांना माझ्या शुभेच्छा, असा टोला यावेळी सुळे यांनी चित्रा वाघ यांना लगावला.


इतिहास हा खरा मांडला पाहिजे :आज तुषार गांधी यांनी सावरकरांच्या बाबतीत जो ट्विट केला आहे. त्याबाबत सुळे यांना विचारले असता ते म्हणाले की इतिहास हा खरा मांडला पाहिजे. हर हर महादेव हा सिनेमा आहे. हे मी समजू शकते. पण फिकक्षण आणि नॉन फिकक्षण या दोन गोष्टी आहे. हर हर महादेव चित्रपटात जी गोष्ट दाखवली ती कधीच झाली नाही. आज ज्या काही ट्विट समोर येत आहे. त्याला फॅकच्युअल बेस असल्या शिवाय समोर येत नाही. त्यामुळे याची नोंद गांभीर्याने घेतली पाहिजे. मी ट्विट बघितल नाही पाहणार माहिती घेणार आहे.


स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या दोन बाजू : राहुल गांधी यांनी सावरकरांच्या बाबतीत जी भूमिका मांडली आहे. त्याबाबत सुळे यांना विचारले असता ते म्हणाले की स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या दोन बाजू आहे. एक त्यांचं सायंटिफिक टेंपर एक बाजू आणि दुसरी बाजू राहुल गांधी यांनी सांगितली आहे. सावरकर यांच्या बाबतीत जेव्हा बोलतो तेव्हा त्यांच्या दोन टोकाच्या बाजू आहे, असे यावेळी सुळे म्हणाल्या.

ABOUT THE AUTHOR

...view details