महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दिराबरोबर भांडण झालं तर कोण नवऱ्याला सोडतं का?, सुप्रिया सुळेंचा हर्षवर्धन पाटलांना टोला - सुप्रिया सुळेंची हर्षवर्धन पाटील यांच्यावर टीका

हर्षवर्धन पाटील यांचे भांडण राष्ट्रवादी बरोबर होतं मग काँग्रेस का सोडली, असा सवाल खासदार सुप्रिया सुळेंनी उपस्थित केला आहे.

सुप्रिया सुळे

By

Published : Sep 15, 2019, 4:07 AM IST

पुणे- दिराबरोबर भांडण झालं तर कोण नवऱ्याला सोडतं का? असा खोचक टोला खासदार सुप्रिया सुळे यांनी हर्षवर्धन पाटील यांना लगावला. शिरुर तालुक्यातील सणसवाडी येथील कार्यकर्ता मेळाव्यात त्या बोलत होत्या.

हर्षवर्धन पाटलांवर टीका करताना सुप्रिया सुळे

हेही वाचा - कर्जमाफीची फसवणूक करणाऱ्या सरकारविरोधात गुन्हा दाखल करणार - सुप्रिया सुळे

पाटील यांचे भांडण राष्ट्रवादी बरोबर होतं मग काँग्रेस का सोडली, असा सवाल खासदार सुप्रिया सुळेंनी उभा करत "दिरा बरोबर भांडण झाल्यावर कोण नवऱ्याला सोडतं का" असा संसार चालतो का? असा सवाल उभा करत याबाबत मी इंदापुरात जाहिरपणे बोलणार असून मी कुणाच्या बापाला घाबरत नसल्याचेही खासदार सुळे म्हणाल्या.

हेही वाचा - पवारसाहेब तुमचं भाग्य.... बरं झालं तुम्हाला मुलगा नाही - सुप्रिया सुळे

लोकसभा निवडणुकीत पाटील यांनी अगदी प्रामाणिकपणे काम केल्याचे कबुली खासदार सुळेंनी दिली. मात्र, पुढील काळात असं काय घडलं कळलच नाही आणि राष्ट्रवादी काँग्रेसला लक्ष करुन ते टीका करू लागले. सुप्रिया सुळे व राहुल गांधी व हर्षवर्धन पाटील यांची दिल्लीत बैठक झाली, असे सांगत पाटलांनी राष्ट्रवादीवर टीका केली होती. मात्र, आमची तिघांची कधीच बैठक झाली नाही. त्यामुळे खोटं बोलून टीका करू नका अन्यथा "मी तोंड उघडले तर तुमच्या अडचणी वाढतील" असे खासदार सुळेंनी कार्यकर्ता मेळाव्यात जाहिरपणे सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details