पुणे: महाराष्ट्रात अडचणीत असलेल्या शेतकऱ्याला दुर्दैवाने आता कोणीच वाली राहिला नाही. राज्यांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण असून ही परिस्थिती गंभीर असल्याची टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी शिंदे सरकारवर केली आहे.
महाविकास आघाडीने लोकांपर्यंत पाणी पोहोचवलं नाही:आज त्या पुरंदर तालुक्यात दौऱ्यावर आहेत. त्यामध्ये तेजल जीवन मिशन अंतर्गत काही कार्यक्रम त्या घेत आहेत. त्यावेळी त्या बोलत होत्या काही दिवसापूर्वीच जलराज्यमंत्री प्रल्हाद सिंह हे बारामतीचा दौरा करून गेले. त्यावेळी त्याने महाविकास आघाडीने लोकांपर्यंत पाणी पोहोचवलं नाही, अशी टीका केली होती. त्यानंतर आता सुप्रिया सुळे मतदारसंघात कार्यक्रमात घेत आहेत.
निवडणूक लढवण्याची तयारी:पुरंदर तालुक्यात जल जीवन मिशन अंतर्गत कार्यक्रम आम्ही घेत आहोत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात जलजीवनचे कामे आणि त्याचा निधी मोठ्या प्रमाणात आम्हाला मिळाला. त्यामुळे स्थानिक आमदार संजय जगताप करत असल्याचे यावेळी सुप्रियाताई सुळे म्हटलेल आहे. बारामती तालुका जिल्हा सातत्याने भाजपा टार्गेट केले जाते. त्याचबरोबर काही लोक तुमच्या विरोधात निवडणूक लढवण्याची तयारी करत आहेत. आणि बारामती त्याबद्दल विचारले असता आम्ही दडपशाहीत विश्वास ठेवत नाही, असेही सुप्रिया सुळे यांनी यावेळी म्हणाले आहेत.
पाठराखण करण्याचे पाप हे इडी सरकार:महाविकास आघाडीने राज्यपाल यांना परत बोलावून घ्यावं, अशी मागणी केली आहे. काल संपूर्ण राज्यात आंदोलन केली आहे. राज्यात असवस्थेचे वातावरण आहे. केंद्र सरकार मात्र आमच्या मागणीकडे दुर्लक्ष करत आहे. ज्यांनी 5 वर्ष राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम केलं तीच व्यक्ती त्यांची पाठराखण करते आहे. सातत्याने छत्रपती शिवाजी महाराज असेल फुलेंचा अपमान करणाऱ्या व्यक्तीची पाठराखण करण्याचे पाप हे इडी सरकार करत आहेत. राज्यपालांच्या विरोधात होणारे आंदोलन आणि त्याने केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ लोकांची भूमिका मांडताना ही प्रतिक्रिया दिली आहे.