बारामती -बाळासाहेब ठाकरे यांच्या पश्चात त्यांचे नाव घेऊन समाजकारण आणि राजकारण करण्याचा प्रथम अधिकार माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आहे. शिवसेनेचा भावी वारसदार कोण असेल याबाबत बाळासाहेब ठाकरे यांनीच एका जाहीर कार्यक्रमात 'माझ्यावर जसे तुम्ही प्रेम केले, तसेच उद्धववरही करा', असे म्हणाले होते. याची आठवण करून देत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शिवसेनेचा उत्तराधिकारी उद्धव ठाकरे असल्याचे सांगितले. सुप्रिया सुळेंनी भिगवण येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
'देशाच्या दृष्टीने ही गंभीर बाब' - शिंदे सरकार स्थापणहोण्यापूर्वी भाजपचे अनेक नेते राष्ट्रवादी, शिवसेनेच्या अनेक नेत्यांवर वेगवेगळे आरोप करत होते. मात्र, सध्या तेच लोक सरकारमध्ये आहेत. यावर बोलताना खासदार सुळे म्हणाल्या की, तिकडे गेलेल्या अनेकांना सरकारने क्लीनचीट दिली आहे. तिकडे गेलेले अनेक नेते असे म्हणतात की आम्ही भाजपमध्ये आल्यापासून आम्हाला काही अडचणी नाहीत. राज्यातील सरकारमधील एका गृहस्थाने तर केंद्रीय मंत्री अमित शहा यांचे नाव घेत थेट पत्रकारांसमोरच म्हटलं मी एका भाजपच्या महत्त्वाच्या नेत्याला भेटलो आहे. त्या नेत्याने मला शब्द दिला आहे की, मला काही अडचण येणार नाही. त्यामुळे मला सकाळी सात वाजता कोणी उठवायला येईल याची मला चिंता नाही. देशाच्या दृष्टीने ही गंभीर बाब असल्याने याबाबत सदर गृहस्थाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा यांच्या निदर्शनास वरील बाब आणून देणार असल्याचे सुळेंनी sule complain maharashtra government mlas to pm narendra modi सांगितले.