पुणे- शरद पवार हे फिल्डवरचे नेते आहेत, म्हणून ते फिल्डवर असतात. काम कसे करायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो, असे म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे.
शरद पवार 'फिल्डवर'चे नेते, म्हणूनच ते 'फिल्डवर' असतात, सुप्रिया सुळेंचा मुख्यमंत्र्यांना टोला - फिल्ड
फडणवीस यांचा आवडता शब्द 'पारदर्शक' आहे. मग पारदर्शकताच पाहिजे असेल तर ईव्हीएम वापरू नका, असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.
पुण्यात छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात पार पडली. यावेळी सुळे यांच्या हस्ते डेक्कन येथील संभाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला आणि त्यानंतर मिरवणूकही काढण्यात आली. त्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या.
ईव्हीएमवर शरद पवार यांनी व्यक्त केलेल्या संशयाबद्दल विचारले असता, त्या म्हणाल्या, ईव्हीएम नकोच अशीच आमची भूमिका आहे. फडणवीस यांचा आवडता शब्द 'पारदर्शक' आहे. मग पारदर्शकताच पाहिजे असेल तर ईव्हीएम वापरू नका, असे मत त्यांनी व्यक्त केले.