पुणे- नागरिकत्व संशोधन सुधारणा कायद्यावरून सध्या देशात मोठा गदारोळ माजला आहे. या कायद्याला अनेक संघटना, अनेक पक्षांकडून विरोध केला जातो आहे. मात्र, पुण्यात नागरिकत्व सुधारणा कायद्याला पाठिंबा देण्यासाठी नागरिकांनी मानवी साखळी करत निदर्शने केली आहेत.
नागरिकत्व सुधारणा कायद्याला पाठिंबा देत पुण्यात मानवी साखळी - नागरिकत्व काद्याला पाठींबा देण्यासाठी मानवी साखळी
देशात एकीकडे या कायद्याला विरोध वाढत असताना हिंसक घटना देखील घडल्या आहेत. तर दुसरीकडे नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनात काही संघटना, नागरिक वैयक्तिक पातळीवर समोर येत आहेत.
हेही वाचा-डाटा लीक झाल्याचा गुगलपाठोपाठ ट्विटरचा भारतीयांना इशारा
देशात एकीकडे या कायद्याला विरोध वाढत असताना हिंसक घटना देखील घडल्या आहेत. तर दुसरीकडे नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनात काही संघटना, नागरिक वैयक्तिक पातळीवर समोर येत आहेत. पुण्यात आज (शनिवारी) सायंकाळी नागरिकत्व संशोधन सुधारणा कायद्याला पाठिंबा देण्यासाठी नागरिक रसस्त्यावर आले. या कायद्याला आमचे समर्थन आहे, असे मेसेज अनेक व्हाॅट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून फिरवण्यात आले. साखळी पद्धतीने निदर्शन करण्यासाठी नागरिक वैयक्तिकरित्या जंगली महाराज रस्त्यावरील संभाजी उद्यानात समोर जमा झाले होते. याठिकाणी कायद्याच्या बाजूने जोरदार घोषणाबाजी करत सरकारला समर्थन देण्यात आले.