महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सैतानाचा अवतार म्हणत महिलेचा अमानुष छळ.. अनैसर्गिक कृत्य करण्यास पाडले भाग, बारामतीतील प्रकार

अंधश्रद्धेच्या भावनेतून घरातील महिलेचा छळ करत मांत्रिकाच्या मदतीने अनैसर्गिक कृत्य करायला लावण्याचा धक्कादायक प्रकार बारामतीमध्ये उघडकीस आला आहे.

superstition-in-baramati-
superstition-in-baramati-

By

Published : Oct 22, 2021, 6:40 PM IST

बारामती -जादूटोणा तंत्र- मंत्र यातून मारहाण व कायदा सुव्यवस्था बिघडण्याची प्रकरणे दिवसेंदिवस वाढत आहेत. सध्या अंधश्रद्धा बरीच फोफावलेली दिसत आहे. अशीच घटना बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर परिसरात समोर आलेली आहे. अंधश्रद्धेच्या भावनेतून घरातील महिलेचा छळ करत मांत्रिकाच्या मदतीने अनैसर्गिक कृत्य करायला लावण्याचा धक्कादायक प्रकार बारामतीमध्ये उघडकीस आला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार महेंद्र माणिकराव गायकवाड, राजेंद्र माणिकराव गायकवाड, कौशल्या माणिकराव गायकवाड, निता अनिल जाधव, मांत्रिक तात्या (नाव पत्ता पुर्ण नाही ) यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 25 वर्षांपूर्वी लग्न झालेल्या महिलेला पहिली मुलगी झाली. यामुळे तू पांढऱ्या पायाची आहेस, असे वारंवार म्हणून घरातील सदस्यांनी तिचा छळ सुरू केला. माहेरून पैसे आणावेत याबाबत अनेक वेळा जाचहाट केला होता. भूतबाधा झाली आहे, असे म्हणून तात्या नावाच्या मांत्रिकाला घरी बोलावले होते. लिंबू उतरून उतारा टाकणे, वेगवेगळे पदार्थ खायला लावणे, काहीवेळा अगदीच उपाशी ठेवणे, अनैसर्गिक कृत्य करण्यास भाग पाडणे असे प्रकार नेहमी घडत असत.

पीडितेने सांगितले की, शुक्रवारी 15 ऑक्टोबर रोजी घरात कोणी नसताना सासू आणि दीर यांनी मारहाण केली. तू सैतानाचा अवतार आहेस असे म्हणून पीडितेच्या कडेने हळदी-कुंकवाचे गोल रिंगण करून त्यामध्ये तिला बसवले. पीडितेला हाताने व काठीने बेदम मारहाण केली. नग्न करून अघोरी कृत्य करण्यास भाग पाडले. या सर्व प्रकारातून पीडितेने कशीबशी सुटका करून घेतली.

पीडितेने सांगितले की, शेजारील लोकांना तिच्या रडण्याचा आवाज आला. त्यांनी चौकशी केली आणि माहेरी कळवले. माहेरच्यांनी येऊन याबाबत पोलिसांकडे रितसर तक्रार दाखल केली. असे बारामती पोलिस ठाण्यात देण्यात आलेल्या फिर्यादीत पीडित महिलेने म्हटले आहे. फिर्यादी वडगाव निंबाळकर पोलीस ठाणे हद्दीतील रहिवाशी असल्याने याबाबतचा अधिक तपास वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे करीत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details