महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

हडपसर मतदार संघात 'स्टारवॉर', राष्ट्रवादी आणि भाजपच्या प्रचार रॅलीत अभिनेत्यांचा 'रोड शो' - पुणे प्रचारसभा सनी देओल

हडपसर मतदारसंघात भाजपचे योगेश टिळेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे चेतन तुपे आणि मनसेचे वसंत मोरे यांच्यात तिरंगी लढत आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादीने अभिनेते, खासदार डॉ अमोल कोल्हे यांना प्रचारासाठी मैदानात उतरवले होते. आता भाजपनेही उमेदवार योगेश टिळेकर यांच्या प्रचारासाठी बॉलिवूड अभिनेते, खासदार सनी देओल मैदानात उतरले आहेत.

सनी देओल

By

Published : Oct 15, 2019, 9:03 PM IST

पुणे - विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. पुण्यातील प्रचारामध्ये आता एक प्रकारची चुरस पहायला मिळत आहे. हडपसर मतदारसंघात भाजपचे योगेश टिळेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे चेतन तुपे आणि मनसेचे वसंत मोरे यांच्यात तिरंगी लढत आहे. या मतदारसंघात भाजपचे योगेश टिळेकर यांच्या प्रचारासाठी बॉलिवूड अभिनेते, खासदार सनी देओल मैदानात उतरले आहेत. मतदारसंघात त्यांची मंगळवारी रॅली आयोजित करण्यात आली होती.

पुण्यात भाजप उमेदवाराच्या प्रचारार्थ अभिनेते, खासदार सनी देओल मैदानात


काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसने अभिनेते, खासदार डॉ अमोल कोल्हे यांना प्रचारासाठी मैदानात उतरवले होते. हडपसर मतदारसंघातील अनेक प्रभागात त्यांची रॅली काढण्यात आली होती. त्याला प्रतिसादही चांगला मिळाला होता. यात मनसेचे उमेदवार वसंत मोरे यांच्या प्रचारासाठी सोमवारी राज ठाकरे यांची सभा पार पडली. तर, भाजपने देखील मंगळवारी सनी देओलला मैदानात उतरवले. एकुणच काय तर या मतदारसंघात 'स्टारवॉर' पहायला मिळत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details