पुणे - मराठा समाजाच्या आरक्षणाविषयी झोपेलल्या सरकारला जागं करण्यासाठी विनायक मेटे यांच्या अध्यक्षतेखाली 13 मराठा संघटना मिळून जागरण गोंधळ आणि काळे कपडे घालून आंदोलन करणार आहेत. उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नाशिक दौऱ्यावर येत आहेत. त्यावेळी त्यांचा मराठा समन्वय समितीच्या कार्यकर्त्यांकडून निषेध करण्यात येणार आहे. मात्र, उद्या मुख्यमंत्र्यांनी नाशिकचा दौरा रद्द केला तर पुण्यातील बालगंधर्व चौकात मराठा समनव्य समितीकडून जागरण गोधळ घालत सरकारला जाब विचारला जाईल. त्याचबरोबर मराठा समाजाच्या आरक्षणासाठी असलेल्या उपसमितीवरुन मंत्री अशोक चव्हाण यांना हटवावे अशी मागणीही करण्यात आली आहे. आज (शनिवार) पुण्यात मराठा समनव्य समितीची बैठक पार पडली यामध्ये हा निर्णय घेण्यात आला.
आरक्षणासाठी मेटेंच्या अध्यक्षतेखाली मराठा समन्वय समितीचे उद्या आंदोलन - मराठा आरक्षणासाठी आंदोलन
मराठा समाजाच्या आरक्षणाविषयी झोपेलल्या सरकारला जागं करण्यासाठी विनायक मेटे यांच्या अध्यक्षतेखाली 13 मराठा संघटना मिळून जागरण गोंधळ आणि काळे कपडे घालून आंदोलन करणार आहेत. उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नाशिक दौऱ्यावर येत आहेत. त्यावेळी त्यांचा मराठा समन्वय समितीच्या कार्यकर्त्यांकडून निषेध करण्यात येणार आहे.
महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात सध्या सुप्रिम कोर्टात सुनावणी सुरू आहे. परंतु, या सूनावणीसंदर्भात महाविकास आघाडी सरकार निष्काळजीपणा दाखवत आहे. याला सर्वस्वी अशोक चव्हाण जबाबदार आहेत. त्यांच्या नाकर्तेपणामुळे हे आरक्षण जातय की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे सरकार विरोधी बोलावं लागत असल्याचे शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी सांगितले. सरकारने अशोक चव्हाण यांच्याकडील जबाबदारी काढून एकनाथ शिंदे यांच्याकडे जबाबदारी द्यावी, अशी मागणीही मेटे यांनी यावेळी केली.
सोशल मीडियाच्या माध्यमातून मराठा समाजाच्या तरुणांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, अशोक चव्हाण यांना प्रश्न विचारावे. सरकारने बैठक घेऊन मराठा समाजाला आरक्षणाबाबत माहिती द्यावी. सरकार जोपर्यंत विश्वास देत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहील, असेही विनायक मेटे यांनी स्पष्ट केले.