महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भारताच्या सर्वोच्च कांचनजुंगा शिखरावर फडकला तिरंगा; मराठमोळ्या सुमितने केली मोहीम फत्ते - शिखर

२०१२ मध्ये माउंट एव्हरेस्ट, २०१३ मध्ये माउंट ल्होत्से, २०१४ मध्ये माउंट मकालू, २०१६ मध्ये माउंट धौलागिरी आणि माउंट च्यो ओयु व २०१७ मध्ये माउंट मनास्लुवर मोहीम यशस्वी करण्यात आली होती.

सुमित मांदळे

By

Published : May 15, 2019, 7:35 PM IST

पुणे- आंबेगाव तालुक्यातील अवसरी बुद्रुकच्या सुमित मांदळे या सुपुत्राने कांचनजुंगावर आज तिरंगा फडकवत कांचनजुंगा मोहीम सर केली आहे. या मोहिमेमुळे गिरीप्रेमीने एक इतिहासच रचला आहे. गिरीप्रेमीच्या दहा गिर्यारोहकांनी भारताच्या सर्वोच्च शिखरावर तिरंगा फडकावला आहे. उमेश झिरपे यांच्या नेतृत्वाखाली यशस्वी झालेली ही सातवी अष्टहजारी मोहीम आहे. आज (बुधवार) सकाळी साडेपाच ते सहाच्या दरम्यान हे शिखर सर केले आहे.

मराठमोळ्या सुमितने केली मोहीम फत्ते

या आधी २०१२ मध्ये माउंट एव्हरेस्ट, २०१३ मध्ये माउंट ल्होत्से, २०१४ मध्ये माउंट मकालू, २०१६ मध्ये माउंट धौलागिरी आणि माउंट च्यो ओयु व २०१७ मध्ये माउंट मनास्लुवर मोहीम यशस्वी करण्यात आली होती.

सुमित मांदळे या सुपुत्राने कांचनजुंगावर आज तिरंगा फडकवत कांचनजुंगा मोहीम सर केली

अशी कामगिरी करणारे उमेश झिरपे भारतातील एकमेव गिर्यारोहक आहेत. या मोहिमेदरम्यान गिरीप्रेमीच्या १० गिर्यारोहकांसह ३० आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक माउंट कांचनजुंगावर चढाई करण्यासाठी सहभागी झाले होते.

आंतरराष्ट्रीय मोहिमेचे बेस कॅम्पवरुन नेतृत्व व संयोजन झिरपे यांनी केले. गिरीप्रेमीच्या आशिष माने, रुपेश खोपडे, भूषण हर्षे, आनंद माळी, प्रसाद जोशी, कृष्णा ढोकले, डॉ. सुमित मांदळे, विवेक शिवदे, किरण साळस्तेकर व जितेंद्र गवारे यांनी शिखर चढाई केली. कांचनजुंगा इको इक्स्पेडीशन २०१९ ही भारतातील सर्वात मोठी व सर्वात पहिली यशस्वी नागरी मोहीम. आहे.

भारताच्या सर्वोच्च कांचनजुंगा शिखरावर फडकला तिरंगा

एकाच दिवशी ३० च्या आसपास गिर्यारोहकांनी कांचनजुंगावर चढाई करणे हा नवा विक्रम ज्येष्ठ गिर्यारोहक माया शेर्पा आणि सिंगापूरचे खु स्वी चाऊ यांनी देखील उमेश झिरपे या मोहिमेदरम्यान शिखर चढाई केली.

भारताच्या सर्वोच्च कांचनजुंगा शिखरावर फडकला तिरंगा

माउंट कांचनजुंगाविषयी माहिती -

  • उंची: ८५८६ मीटर
  • माउंट एव्हरेस्ट व माउंट के २ नंतर उंचीनुसार जगातील तिसऱ्या क्रमांकाचे शिखर
  • भारतातील सर्वात उंच शिखर
  • भारत आणि नेपाळच्या सीमेवर वसलेले शिखर

अवसरी बुद्रुक ग्रामस्थ व शिवसाम्राज्य चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने डॉ. सुमितचे अभिनंदन करण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details