महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ईटीव्ही भारत स्पेशल: पिंपरी-चिंचवडमध्ये वाढतेय आत्महत्यांचे प्रमाण - पिंपरी-चिंचवड आत्महत्या प्रमाण

पिंपरी-चिंचवड शहरात आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. नोकरीची काळजी, कौटुंबिक वाद, लॉकडाऊनच्या काळात वेतनावर झालेला परिणाम, जीवन शैलीत झालेला बदल, कुटुंबाच्या वाढलेल्या अपेक्षा या सर्वांखाली तरुण, महिला, पुरुषांवरील मानसिक तणाव वाढला आहे. याच नैराश्यातून अनेक जण आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलत आहेत.

Suicide
आत्महत्या

By

Published : Jun 25, 2020, 10:39 PM IST

पुणे: पिंपरी-चिंचवड शहरात अवघ्या 24 दिवसांमध्ये 35 आत्महत्या झाल्याचे समोर आले आहे. यातील बहुतांश आत्महत्या नैराश्यातून झाल्याचे पोलिसांनी सांगितले. कोरोना लॉकडाऊन आणि त्यानंतर अनेकांचे रोजगार गेले. त्यामुळे अनेकजण आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत आहेत. आत्महत्या करण्यापासून नागरिकांना परावृत्त करण्याची गरज निर्माण झाली आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये वाढतेय आत्महत्यांचे प्रमाण

बेरोजगारी आणि कौटुंबिक वादातून अनेक जणांनी आत्महत्या करत आपली जीवनयात्रा संपवली, असे पोलिसांची म्हणने आहे. 'कॉपीकॅट' या प्रकारानुसार एखाद्या सेलिब्रिटीची आत्महत्या होते तेव्हा, असे प्रकार पहायला मिळतात. तसेच, कोरोना प्रादुर्भावामुळे जीवन शैलीत आलेला बदलही लोकांना आत्महत्येस प्रवृत्त करत आहे, असे मानसोपचार डॉ. मनजीत संत्रे यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले.

मार्च महिन्यात कोरोना संकटामुळे लॉकडाऊन करण्याची वेळ प्रशासनावर आली. दरम्यान, लॉकडाऊन वाढतच गेले. या काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, उद्योग, व्यवसाय डबघाईला आले. आता अनलॉकनंतर व्यवसाय पुन्हा उभारी घेत असल्याचे चित्र आहे. पिंपरी-चिंचवड शहराला रेड झोनमधून वगळण्यात आले. शहरातील जनजीवन पूर्वपदावर येत आहे. मात्र, पिंपरी-चिंचवड शहरात आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. नोकरीची काळजी, कौटुंबिक वाद, लॉकडाऊनच्या काळात वेतनावर झालेला परिणाम, जीवन शैलीत झालेला बदल, कुटुंबाच्या वाढलेल्या अपेक्षा या सर्वांखाली तरुण, महिला, पुरुषांवरील मानसिक तणाव वाढला आहे. याच नैराश्यातून अनेक जण आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलत आहेत.

आत्महत्यांची जून महिन्यातील आकडेवारी -

चिंचवड - 3, भोसरी - 3, भोसरी एमआयडीसी - 2, निगडी - 2, दिघी - 1, चाकण - 2, आळंदी - 2, वाकड - 7, हिंजवडी - 6, सांगवी- 3, देहूरोड - 1, तळेगाव दाभाडे - 2, तळेगाव एमआयडीसी - 1

ABOUT THE AUTHOR

...view details