महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Pune cops nab sextortion case : केवळ 2200 लोकांच गाव सेक्सटॉर्शनं गाजलं, आरोपीला रायपूर सुकेती येथुन अटक - सेक्सटॉर्शन प्रकरणात नागरिकांची फसवणुक

पुण्यातील धनकवडी परिसरात राहणाऱ्या एका युवकाला महिलेचा व्हॉटसॲप डिपीचा वापर करून; मोबाईलद्वारे संपर्क करीत न्यूड व्हिडीओ बनवुन व्हायरल करण्याच्या धमकी देण्यात आली होती. यामुळे 30 सप्टेंबर रोजी या तरुणाने आत्महत्या केली. याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी तब्बल आठ दिवस शोध घेत राजस्थान मधील रायपूर सुकेती या गावातून एका आरोपीला अटक केली आहे.

Police Arrested Accused Sextortion Case
आरोपीला रायपूर सुकेती येथुन अटक

By

Published : Jan 16, 2023, 6:15 PM IST

प्रतिक्रिया देतांना सावळाराम साळगांवकर

पुणे : पुण्यातील धनकवडी परिसरात राहणाऱ्या तरुणाचा न्यूड व्हिडीओ फेसबुक, इन्स्टाग्राम, मॅसेंजर, टयुटर, यु टयुब चॅनेल, फेसबुक या सोशल मिडीया साईटवर अपलोड करण्याची धमकी देत, आरोपीने साडेचार हजार रुपये उकळले होते. त्यानंतरही सायबर टोळीने वारंवार तरुणाला फोन करून, न्यूड व्हिडीओ अपलोड करण्याची भिती दाखवत त्याला मानसिक त्रास दिला. त्यामुळे त्याने 'मै सुसाईड कर रहा हूं' असा मॅसेज आरोपीला केला. त्यावर 'करो मै व्हिडीओ ऑनलाईन करता हूं' असे म्हणत सतत पैशाची मागणी केली. अशा प्रकारे आरोपीने तरुणाला आत्महत्या करण्यास भाग पाडले.


रेकी करुन केली अटक :सहकारनगर पोलिसांनी आरोपींनी गुन्ह्यात वापरलेल्या मोबाईलचे तांत्रीक विश्लेषण करुन माहिती काढली. आरोपी राजस्थानमध्ये असल्याचे उघडकीस येताच पोलीस उप-निरीक्षक हसन मुलाणी, पोलीस अंमलदार संजय गायकवाड, सागर सुतकर, निखील राजीवडे, सागर कुंभार यांनी (रायपूर सुकेती, ता. सिकरी जि. भरतपूर), राजस्थान गाठले. तेथे जात संशयीत आरोपीचा ठावठिकाणाबाबत माहिती घेत स्थानिक पोलिसांच्या मदतीने सलग 8 दिवस व रात्रीची रेकी केली. अखेर आरोपीला ताब्यात घेत पोलीस कस्टडी रिमांड घेतली आहे. विशेष बाब म्हणजे या सूकेती गावातील लोकसंख्या ही 2200 असून, या गावातील सर्वच लोक हे सेक्सटॉर्शन च्या घटनेत नागरिकांची फसवणूक करत आहे. शाहाबाज खान ( वय 24 ) रायपूर सुकेती भरतपूर ( राजस्थान ) असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे.


अख्ख गाव अशिक्षित पण :याआधी दत्तवाडी पोलिसांनी सेक्सटॉर्शन च्या प्रकरणात ज्या आरोपीला अटक केली होती. तो आरोपी देखील राजस्थान मधील अलविरा गावातील होता. आणि तेथील गाव सुध्दा अश्या घटनांमध्ये पुढे होते. आणि आत्ता देखील रायपूर (सुकेती, ता. सिकरी जि. भरतपूर) या गावातून सहकार नगर पोलिसांनी ज्या आरोपीला अटक केली आहे. त्या गावचं गाव सेक्सटॉर्शन च्या घटनेत पुढे असून, नागरिकांची फसवणूक करत आहे. विशेष बाब म्हणजे आरोपी तसेच गावातील लोक हे अशिक्षित आहे, अख्खं गाव अश्या घटनेमध्ये पुढे आहे. आत्तापर्यंत कोणीही या गावात जाऊन आरोपीला अटक केलेली नव्हती. जो या गावात जायचा त्याच्यावर दगडफेक करून, आरोपीची पोलिसांकडनं सुटका होत होती. मात्र पुणे पोलिसांनी आठ दिवस राहून संपूर्ण माहिती घेत रात्री तीन वाजता आरोपीला अटक केली आहे.



पुण्यात सेक्सटॉर्शनचे 1400 अर्ज : पुणे शहरात सेक्सटॉर्शन च्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहे. वर्षभरात पुणे सायबर पोलीस स्टेशन येथे सेक्सटॉर्शन चे तब्बल 1400 अर्ज आले आहे आणि दोन तरुणांनी सेक्सटॉर्शन च्या घटनेमुळे आत्महत्या केली आहे. या दोन्ही आत्महत्या प्रकरणी पुणे पोलिसांनी आरोपीला अटक केली असून; दोन्ही आरोपी हे राजस्थान येथीलच आहेत. तर अख्खं गावच्या गावच या घटेनेत पुढे असल्याचं समोर आलं आहे.


कशी होते फसवणूक :साधारणतः आपल्याला आपल्या व्हॉट्सॲप वर एका नंबरवरून सुंदर मुलीचा फोटो येतो आणि त्यांनतर हळूहळू ओळख केली जाते. आणि जस जशी ओळख निर्माण होते. तसं तसं समोरून आग्रह केला जातो की, व्हिडियो कॉल वर बोलूया आणि त्यानंतर जेव्हा व्हिडियो कॉल केला जातो. तेव्हा समोर असलेली मुलगी न्यूड होते. आणि ती आपल्याला ही न्यूड होण्याबाबत आग्रह करते. आणि चेहरा कॅपचर करण्यासाठी दोन मिनिटांचा व्हिडियो कॉल केला जातो. आणि लगेच व्हॉट्सॲप वर त्या व्हिडियो कॉल चा व्हिडियो येतो आणि तेथून धमक्यांना सुरवात होते. पहिल्यांदा अशी धमकी दिली जाते की, जर आपण पैसे नाही दिले तर मी तक्रार दाखल करेल, अन्यथा सोशल मीडियावर व्हायरल करेल. आणि याच धमकीला तरुण बळी पडतात आणि पैसे देतात. जर पैसे दिले गेले नाही, तर सोशल मीडियावर व्हायरल केलं जातं आणि बदनामी होऊ नये म्हणून तरुण टोकाचं पाऊल उचलतात.



पोलिसांकडून आवाहन :पुणे सायबर पोलिसांकडून आवाहन करण्यात येत आहे की, अनोळखी व्यक्ती जर कोणीही व्हॉट्सॲप किंवा सोशल मीडियावरून बोलत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करावे. तसेच जर संशय आला तर लगेच संबंधित अनोळखी व्यक्तीला ब्लॉक करा. तसेच घाबरून जाऊ नका. कोणीही अधिकृत सोशल मीडियावर तुमचं व्हिडियो व्हायरल करू शकत नाही. तसेच जर कोणीही धमक्या दिल्या तर तात्काळ संबंधित पोलीस स्टेशन किंवा सायबर पोलीस स्टेशन येथे येऊन तक्रार दाखल करा. कोणीही टोकाचे पाऊल उचलू नका, असं आवाहन देखील यावेळी सहकार नगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगांवकर यांनी केलं आहे.



दत्तवाडीत तरुणाकडून आत्महत्या :पुण्यातील दत्तवाडी भागात राहणाऱ्या 19 वर्षीय शंतनू वाडकर या तरुणाची प्रीत यादव या तरुणी सोबत इन्स्टाग्रामवर ओळख झाली असताना दोघांमध्ये ओळख झाल्यावर त्याने तिला अर्धनग्न फोटो पाठवले. त्यानंतर त्या तरुणीने पैसे दे अन्यथा सोशल मीडियावर फोटो व्हायरल करेल, अशी धमकी दिली. आणि या सततच्या त्रासाला कंटाळून या 19 वर्षीय शंतनू वाडकर या तरुणाने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली. दत्तवाडी परिसरातील अनंत कुमार सोसायटीमध्ये शंतनू वाडकर हा 19 वर्षीय तरुण राहण्यास होता. तो सोशल मीडियावर सक्रिय होता.

सतत पैसे मागितल्यामुळे आत्महत्या : शंतनू याची इन्स्टाग्रामवर प्रीत यादव असे आयडी असलेल्या तरुणीशी ओळख झाली. तर त्याच दरम्यान प्रीत यादव हिने शंतनूला अर्धनग्न फोटो मागितल्यावर त्याने तिला फोटो शेयर केले. त्यानंतर मला पैसे दे,अन्यथा तुझे अर्धनग्न फोटो व्हायरल करेल, अशी धमकी प्रीत यादव हिने दिली. त्यावर त्याने 4 हजार 500 रुपये ऑनलाईन दिले. त्यानंतर देखील सतत पैसे मागू लागल्याने या सततच्या त्रासाला कंटाळून शंतनूने 28 सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास राहत्या असलेल्या इमारतीवरून उडी मारली. त्यानंतर त्याला तात्काळ जवळील रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी मृत घोषित केल होतं. याचा तपास करत दत्तवाडी पोलिसांनी आरोपीला राजस्थान येथील अलवीरा गावातून अटक केली आहे.



30 सप्टेंबर घडली होती अशीच घटना :पुण्यातील धनकवडी येथे ऑनलाइन ओळख झालेल्या तरुणीने तरुणाचा नग्नावस्थेतील व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करण्याची धमकी देत सातत्याने खंडणीची मागणी केल्याने, अमोल राजू गायकवाड (रा. तानाजी नगर, धनकवडी) या तरुणाने ३० सप्टेंबर रोजी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. याचा तपास करत सहकार नगर पोलिसांनी राजस्थान येथील सुकेती गावात संशयीत आरोपीचा ठावठिकाणाबाबत माहिती घेत स्थानिक पोलिसांच्या मदतीने सलग 8 दिवस व रात्रीची रेकी केली. अखेर आरोपीला ताब्यात घेतलं आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details