महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शिरूर तालुक्यात उसाच्या शेताला आग, ऊस जळून खाक - Amol Bhor sugarcane crop fire Chandoh

आगीत संपूर्ण ऊस जळून खाक झाला आहे. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज महावितरणकडून व्यक्त करण्यात आला आहे.

ऊस जळून खाक
ऊस जळून खाक

By

Published : Nov 2, 2020, 7:36 PM IST

पुणे -शिरूर तालुक्यातील चांडोह येथे आज दुपारच्या सुमारास अमोल भोर या शेतकऱ्याच्या तीन एकरातील उस पिकाला भीषण आग लागली. आगीत संपूर्ण ऊस जळून खाक झाला आहे. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज महावितरणकडून व्यक्त करण्यात आला आहे.

या घटनेमुळे शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. ऊस शेतीलगत अनेक ठिकाणी विद्युत तार गेलेली आहे. ऊस हा विद्युत तारांना लागून असल्याने अनेक वेळा शॉर्टसर्किटच्या घटना घडतात. सध्या ऊसतोड सुरू आहे. हे करत असताना शेतकरी व ऊसतोड कामगारांनी काळजी घ्यावी, असे आवाहन महावितरणने केले आहे.

हेही वाचा-पिंपरी-चिंचवडमध्ये तोडफोड करणाऱ्या आरोपींची पोलिसांनी काढली धिंड

ABOUT THE AUTHOR

...view details