पुणे :कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी हेमंत रासने यांनी उमेदवारी अर्ज भरणार होता. आता भारतीय जनता पक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारार्थ सुधीर मुनगंटीवार ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत ओंकारेश्वर मंदिर येथून पदयात्रेची सुरुवात करण्यात आली. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, तसेच महायुतीतील घटक पक्षातील नेते मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ते बोलताना म्हणाले की, 1988 मध्ये अदानीची सुरूवात झाली आहे. 1993 मध्ये गुजरात मधील काँग्रेसचे मुख्यमंत्री चीमनभाई पटेल यांनी 10 पैसे मीटरनी कच्छ येथे जागा दिली. तसेच शरद पवार यांचे जवळचे असलेले नेत्यांनी मुद्राचे काम आदानी यांना दिले. आता मोदी यांना बोलायचे आहे. अदानीच्या केसमध्ये काँग्रेसची मार्कशीट आहे. असे देखील यावेळी मुनगंटीवार म्हणाले.
जिंकन्याचा विश्वास:जनतेचे सेवेचा संकल्प करत हा विकासाचा कसबा पेठेची उन्नतीची मशाल घेऊन रासने जनतेच्या भेटीला आज जाणार आहेत. 1985 सोडून कसबा मधील मतदारांनी भाजपला पहिली पसंती दिली आहे. आजही कसबा तसेच चिंचवड मधील जनता आम्हाला पाठिंबा देईल आणि आमचे उमेदवार हे जिंकून येणार असा विश्वास यावेळी यांनी व्यक्त केला. तसेच कसबा गणपती हा मानाचा गणपती आहे. या पोटनिवडणुकीत विजयी होऊन आमची 2014 ची सुरूवात होणार आहे.