महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

MPSC New Pattern 2025 Onwards : एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश; नवीन पॅटर्न 2025 पासून लागू होणार - MPSC New Pattern

राज्यसेवा मुख्य परीक्षा पॅटर्न 2025 पासून  लागू करण्याची मागणी आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्य करण्यात आली अशी माहिती आंदोलनकर्त्या विद्यार्थ्याना आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिली आहे. काही दिवसापूर्वी एमपीएससी विद्यार्थ्यांच्या वतीने आंदोलन पुण्यात आंदोलन करण्यात आले होते. त्यावरुन सरकाने विद्यार्थांची मागणी मान्य करीत राज्यसेवा मुख्य परीक्षा पॅटर्न 2025 पासून राबवण्याचा निर्णय घेतला आहे.

MPSC New Pattern 2025 Onwards
MPSC New Pattern 2025 Onwards

By

Published : Jan 31, 2023, 3:59 PM IST

Updated : Jan 31, 2023, 4:21 PM IST

एमपीएससी नवीन पॅटर्न 2025 पासून लागू होणार

पुणे :राज्यसेवा मुख्य परीक्षा पॅटर्न 2025 पासून राबविण्यात यावा या मागणीसाठी गेल्या महिन्याभरापासून चार वेळा एमपीएससी विद्यार्थ्यांच्या वतीने आंदोलन करण्यात आलं आहे.आज देखील पुण्यातील अलका चौक येथे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वतीने पुन्हा एकदा आंदोलन करण्यात आल आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षा पॅटर्न 2025 पासून लागू करण्याची मागणी आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्य करण्यात आली अशी माहिती आंदोलनकर्त्या विद्यार्थ्याना आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिली आहे.

विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश :आजच्या या आंदोलनात विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या आंदोलनात भाजपचे नेते आमदार गोपीचंद पडळकर, आमदार अभिमन्यू पवार,सदाभाऊ खोत उपस्थित झाले होते. यावेळी त्यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विद्यार्थ्यांच्या प्रश्नाबाबत चर्चा केली होती. त्यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांची मागणी ही सकारात्मक असून आम्ही आजच्या कॅबिनेटमध्ये सकारात्मक निर्णय घेऊ अस यावेळी फोनद्वारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल होते. यावेळी जो पर्यंत निर्णय मान्य होत नाही, तो पर्यंत आम्ही आंदोलन थांबवणार नाही अशी भूमीका विद्यार्थ्यांनी घेतली होती. अखेर 4 तासांच्या आंदोलनानंतर विद्यार्थ्यांच्या या मागणीला यश आले आहे. राज्य सरकारने आजच्या कॅबिनेटमध्ये राज्यसेवा मुख्य परीक्षा पॅटर्न 2025 पासून लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

चार वेळा आंदोलन : आम्ही विद्यार्थी मागील अनेक वर्षांपासून राज्यसेवा परीक्षेची तयारी करीत आहोत. पण अचानक आयोगाकडून आदेश काढला जातो की 2023 पासून तुमच्या अभ्यासक्रमात बदल करण्यात येत आहे. हा निर्णय आम्हाला मान्य नाही.आयोगाने 2025 मध्ये तो नियम लागू करावा अशी आमची राज्य सरकारकडे मागणी आहे. राज्य सरकार अनेक निवडणुका पुढे घेत आहे. त्यामुळे आमचा अभ्यासक्रमाचा निर्णय 2025 पासून लागु करण्याचा निर्णय राज्य सरकारला सहज शक्य आहे. त्यामुळे राज्य सरकारने विद्यार्थ्यांचा विचार करून निर्णय घ्यावा. अशी मागणी विद्यार्थ्यांच्या वतीने करण्यात आली होती. या मागणीसाठी या विद्यार्थ्यांच्या वतीने अलका चौक येथे चार वेळा आंदोलन करण्यात आले आहे. आजच्या या यशाचा श्रेय हा फक्त आणि फक्त विद्यार्थ्यांचे असून यात कोणत्याही पक्षाचे श्रेय नाही.

हेही वाचा -Budget 2023 : कोविडच्या 3 वर्षानंतर आयकर मर्यादेत वाढ होण्याची अपेक्षा; निर्मला सीतारामन सादर करणार अर्थसंकल्प

Last Updated : Jan 31, 2023, 4:21 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details