महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अरुण जेटली यांनी राबविलेल्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे देशात आर्थिक मंदी - सुब्रमण्यम स्वामी - सुब्रमण्यम स्वामी

पुण्यात श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या 319 व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमानंतर सुब्रमण्यम स्वामी बोलत होते.

सुब्रमण्यम स्वामी

By

Published : Aug 18, 2019, 10:01 PM IST

पुणे - माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या कार्यकाळात राबविलेल्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे तसेच जनतेवर भरमसाठ कर लावल्याने आर्थिक मंदी जाणवू लागली आहे. अशा शब्दात माजी अर्थमंत्री आणि खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी भाजपला घरचा आहेर दिला आहे. पुण्यात श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या 319 व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमानंतर ते बोलत होते.

पुण्यात श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या 319 व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमानंतर बोलताना सुब्रमण्यम स्वामी


सुब्रमण्यम स्वामी म्हणाले, की देशाची आर्थिक परिस्थिती सुधारणे हे देखील 370 कलम हटवण्या इतकेच महत्वाचे आहे. कलम 370 संदर्भात सरकारने माझा सल्ला घेतला होता. मात्र, आर्थिक धोरणाबाबत कुठलाही सल्ला घेतला नाही असेही त्यांनी यावेळी सांगितले.


आर्टिकल 370 वर वारंवार वक्तव्य करणारे पाकिस्तानचे पंतप्रधान हे सर्कसमधील एक पात्र आहेत अशा शब्दांत त्यांनी टीका केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details