महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बारामतीत होणार सबजेल, १४ कोटींचा निधी मंजूर - Baramati Sub-jail news

या सबजेलमध्ये प्रशासकीय इमारत, पुरुष आणि महिला बराकी याखेरीज मोठा पॅसेज असणार आहे. यासाठी ८ कोटी ५५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. राज्यातील ग्रामीण भागातील पहिलेच रोड मॉडेल म्हणून कारागृह बांधले जाणार आहे.

Sub-jail to be set up in Baramati
Sub-jail to be set up in Baramati

By

Published : Mar 9, 2021, 6:18 AM IST

पुणे -बारामती येथील सबजेल बांधकामासाठी राज्य सरकारने १४ कोटी रुपये मंजूर केले आहेत. कारागृह इमारतही शहरातील अन्य इमारतींना साजेशी असल्याने बारामती पुन्हा एकदा विकासात अग्रेसर ठरणार आहे. राज्य सरकारच्या गृह विभागाने बारामती शहरातील सबजेल बांधकामासाठी १४ कोटी १६ हजार रुपये निधी मंजूर केला आहे. गृह विभागाच्या अधिकारी सीमा सावंत यांनी यासंदर्भात आदेश जारी केला आहे.

या सुविधा असणार.....

या सबजेलमध्ये प्रशासकीय इमारत, पुरुष आणि महिला बराकी याखेरीज मोठा पॅसेज असणार आहे. यासाठी ८ कोटी ५५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. राज्यातील ग्रामीण भागातील पहिलेच रोड मॉडेल म्हणून कारागृह बांधले जाणार आहे. याशिवाय येथील उपाहारगृहात गॅस पाईपलाईन, बायोडायजेस्ट, रेनवॉटर हार्वेस्टिंग यंत्रणा, तसेच सौरऊर्जेचा वापर होणार आहे. कारागृहात अंतर्गत रस्ते आणि सुमारे ५८ लाख रुपयांचे फर्निचर याठिकाणी होणार असल्याने बारामती शहरातील इतर इमारती प्रमाणेच कारागृहाची इमारतही देखणी असणार आहे.

बारामतीकरांना गिफ्ट.....

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही महिन्यांपासून बारामती तालुक्यात विकासकामांसाठी निधी देण्याचा सपाटा लावला असून, यातून बारामतीकरांना विविध सुविधा उपलब्ध होत आहेत. महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून अनेक प्रकल्पमार्गी लागले असून नुकतेच रविवारी बऱ्हाणपूर येथील उपमुख्यालयासाठी १४२ कोटी आणि सबजेल साठी १४ कोटी रुपये मंजूर करत बारामतीकरांना मोठे गिफ्ट दिले आहे.

हेही वाचा - जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं शाह यांची मोठी घोषणा; भारतीय महिला क्रिकेट संघ कसोटी सामना खेळणार

ABOUT THE AUTHOR

...view details