महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विद्यापीठात राजकीय भूमिका नको - विनोद तावडे

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक नवीन नियमावली तयार केली आहे. या नियमावलीत, वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना राजकीय भूमिका घेता येणार नाही. वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांनी शासनविरोधी कृत्ये करू नयेत, तसेच राष्ट्र विरोधी, समाजात जातीय तेढ निर्माण होणारे तसेच राजकीय पक्षाचे उपक्रम राबवू नये असे निर्देश देण्यात आले आहेत.

students should keep their political views outside the university states vinod tawde

By

Published : Jul 30, 2019, 7:43 AM IST

पुणे - राजकीय भूमिका विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या बाहेर मांडावी. पण एखाद्याला विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडायचे असतील तर ती संधी त्याला असली पाहिजे. असे सांगत, विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या आवारात राजकीय भूमिका घेऊ नये, असा सल्ला शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिला. पुणे विद्यापीठात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

विद्यापीठात राजकीय भूमिका नको - विनोद तावडे

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक नवीन नियमावली तयार केली आहे. या नियमावलीत, वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना राजकीय भूमिका घेता येणार नाही. वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांनी शासनविरोधी कृत्ये करू नयेत, तसेच राष्ट्र विरोधी, समाजात जातीय तेढ निर्माण होणारे तसेच राजकीय पक्षाचे उपक्रम राबवू नये असे निर्देश देण्यात आले आहेत.

या नियमावलीबाबत विचारले असता, विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर विद्यार्थ्यांना राजकीय भूमिकेशिवाय नेतृत्व करता आले पाहिजे. आम्हीही आंदोलनं केली पण दोन्हीमध्ये गल्लत केली नाही. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर विद्यापीठात आंदोलनं केली. तर राजकीय आंदोलनं विद्यापीठाच्या बाहेर अलका टॉकीज चौकात केली. त्यामुळे विद्यापीठाच्या आवारात कुठल्याही राजकीय पक्षाचा प्रचार होता कामा नये. जर प्रश्न विद्यार्थ्यांचे असतील तर त्यांना ती मांडण्याची परवानगी असेलच. असे तावडे यांनी स्पष्ट केले.

ABOUT THE AUTHOR

...view details