पुणे :
सावित्रीबाई फुले विद्यापीठातील विद्यार्थ्यांचे आंदोलन होस्टेल रिकामी असून सुद्धा विद्यार्थ्यांना हॉस्टेल दिली जात नाहीत. ग्रामीण भागातून आलेल्या विद्यार्थ्यांना त्याचा त्रास होत आहे. म्हणून सोमवारी पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यांनी गेट बंद करून आंदोलनाला सुरुवात केलेली आहे. विद्यार्थी अतिशय आक्रमक झालेले (Students Protest of Savitribai Phule University) आहेत.
विद्यार्थ्यांची मागणी : विद्यापीठाचे कुलगुरू यांनी राजीनामा द्यावा, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. कुलगुरू भेटत नाहीत आणि आम्हाला उडवा उडवीचे उत्तरे दिले जातात. इकडून तिकडून, तिकडून इकडे बोलवले जाते, असा आरोप या विद्यार्थ्याने केलेला असून विद्यार्थी आता रस्त्यावरच झोपून आपला अभ्यास करताना दिसत (Students Protest against University Administration) आहेत.
खर्च परवडत नाही :आंदोलनामध्ये या विद्यार्थ्याने स्वतःची गादी पांगरून आणलेले असून ते विद्यापीठाच्या गेटवरच्या रस्त्यावर हे विद्यार्थी झोपलेले आहेत. काही विद्यार्थी इथेच झोपून अभ्यास करत आहेत. हॉस्टेल भेटल्याशिवाय आम्ही आता जाणार नाही, आम्ही ग्रामीण भागातून आलेले विद्यार्थी आहोत. आम्हाला शहरातला खर्च परवडत नाही. हॉस्टेल असताना सुद्धा विद्यापीठ प्रशासन जाणून बुजून आम्हाला देत नाही, असा आरोप या विद्यार्थ्यांचा (not providing Hostel) आहे.
पोलीस बंदोबस्त :विद्यार्थ्यांच्या या मागण्या आता विद्यापीठ प्रशासन मान्य करते का ? विद्यापीठ प्रशासनाला शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांची काळजी आहे का ? कारण एवढ्या रात्री विद्यार्थी जर आंदोलन करत असेल, तर देशाच्या भविष्यासाठी अतिशय घातक गोष्ट आहे. याचा विचार प्रशासनाने करणे गरजेचे आहे. या ठिकाणी सोमवारी पोलीस बंदोबस्तसुद्धा लावण्यात आलेला आहे. पोलीस आता आंदोलन ठिकाणी दाखल झाले आहेत. ते विद्यार्थ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहेत. विद्यापीठाकडून या ठिकाणी आणखी कोणीही आलेले (Students Protest) नाही.
आंदोलन बेकायदेशीर : पोलीस आमच्यावर दबाव आणत असून आमचे नाव लिहून घेत आहेत. हे आंदोलन बेकायदेशीर आहे. तुम्ही कायदेशीर करा, अशी समजूत काढण्याचा प्रयत्न पोलीसांकडून करण्यात येत असल्याचा आरोप सुद्धा या विद्यार्थ्याने केलेला (Savitribai Phule University Pune) आहे.