पुणे- दहावी आणि बारावी परीक्षेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशभरातील विद्यार्थ्यांशी 'परीक्षा पे चर्चा' या कार्यक्रमांतर्गत संवाद साधला. दिल्लीतील तालकटोरा स्टेडियमवर पार पडलेल्या या कार्यक्रमात अनेक विद्यार्थी सहभागी झाले होते. यावेळी पंतप्रधान मोदी यांना मुलांनी प्रश्न विचारले व आपल्या मनातील शंका दूर केल्या.
मोदींशी झालेल्या 'परीक्षा पे चर्चा' नंतर पुण्यातील विद्यार्थ्यांमध्ये उत्साह - pariksha pe charcha Pune
पंतप्रधान मोदी यांचा 'परीक्षा पे चर्चा' हा कार्यक्रम देशभरातील विविध शाळांमध्ये लाईव्ह दाखविण्यात आला. पुण्यातील डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यु-इंग्लिश स्कुलमध्येही हा कार्यक्रम लाईव्ह दाखविण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी झालेल्या या संवादानंतर येथील विद्यार्थ्यांमध्ये उत्साह जाणवला.
पंतप्रधान मोदी यांचा 'परीक्षा पे चर्चा' हा कार्यक्रम देशभरातील विविध शाळांमध्ये लाईव्ह दाखविण्यात आला होता. पुण्यातील डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यु-इंग्लिश स्कुलमध्येही हा कार्यक्रम लाईव्ह दाखविण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी झालेल्या या संवादानंतर येथील विद्यार्थ्यांमध्ये उत्साह जाणवला. यामुळे नक्कीच परीक्षेला सामोरे जाण्यास मदत होणार असल्याची भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. त्यांच्याशी संवाद साधला 'ईटीव्ही भारत' प्रतिनिधी किरण शिंदे यांनी.
हेही वाचा-सीएए विरोधात निदर्शने करणाऱ्यांविरोधात खासदाराच्या मुलाची तक्रार