पुणे- राज्यात सध्या मोठ्या प्रमाणात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. वाढत्या कोरोनाच्या पाश्वभूमीवर राज्य सरकारकडून होणाऱ्या एमपीएससीच्या परीक्षा पूढे ढकलण्यात याव्या, अशी मागणी पुण्यात शिकणाऱ्या एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी केली आहे. सध्या मोठ्या प्रमाणात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. मध्यंतरी विद्यार्थ्यांच्या वतीने करण्यात आलेल्या आंदोलनामुळे मोठ्या संख्येने विद्यार्थी कोरोनाग्रस्त होत आहे. तर काही पालकांकडून वाढत असलेल्या कोरोनामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यासाठी पाठवण्यात येत नाही. म्हणून सरकारने पूढे होणारी परीक्षा काही महिन्यांसाठी पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी या विद्यार्थ्यांनी केली आहे.
आंदोलनामुळे 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू
मध्यंतरी पुण्यात एमपीएससीच्या परीक्षा घेण्यात यावा, या मागणीसाठी मोठ्या प्रमाणात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनामुळे तीन विद्यार्थ्यांना कोरोना होऊन त्या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. तसेच धक्कादायक बाब म्हणजे पाच विद्यार्थ्यांमागे तीन विद्यार्थी हे कोरोना बाधित होत आहे. सध्या राज्याबरोबरच पुणे शहरात देखील कोरोनाचा प्रसार हा मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यात विद्यार्थीही बाधित होत आहेत. विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे सरकारने पुढे होणारी परीक्षा काही महिन्यांसाठी पुढे ढकलावी, अशी मागणी या विद्यार्थ्यांकडून होत आहे.