महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Competitive Examination : स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची अलका टॉकीज चौकात सरकारविरोधात निदर्शने

स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे पुण्यातील अलका टॉकीज चौकात आंदोलन सुरु आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षा पॅटर्न 2025 पासून राबविण्यात यावा अशी मागणी विद्यार्थि करीत आहेत. या आंदोलनात विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. पच्चीस हमारा नही तो तुम्हारा चौबिस नही अशी काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे.

Competitive Examination
Competitive Examination

By

Published : Jan 13, 2023, 9:51 PM IST

स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची अलका टॉकीज चौकात सरकारविरोधात निदर्शने

पुणे - राज्यसेवा मुख्य परीक्षा पॅटर्न 2025 पासून राबविण्यात यावा.या मागणीसाठी पुण्यातील अलका टॉकीज चौकात स्पर्धा परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांच ठिय्या आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. या आंदोलनात काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी पच्चीस हमारा नही तो तुम्हारा चौबिस नही अशी घोषणा देत केंद्र आणि राज्य सरकारला इशारा दिला आहे. काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते अतुल लोंढे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते अंकुश काकडे आंदोलनात सहभागी होत विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे.

राज्य सरकार सोबत बैठक -स्पर्धा परीक्षा देणार्‍या विद्यार्थी वर्गाच्या प्रश्नासाठी आजवर अनेक वेळा राज्य सरकार सोबत बैठक घेतली. त्याभेटी दरम्यान प्रश्न सोडविला जाईल असे सांगितले गेले. आजवर राज्य सरकारने विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष दिले नाही.त्यामुळे विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत.

प्रश्न सोडविण्याची मागणी - हे लक्षात घेण्याची गरज असून या आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून कोणत्याही प्रकाराचा गुन्हा दाखल झाल्यास, सरकारला भविष्यातील परिणामांना सामोरे जावे लागेल असा इशारा काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी राज्य सरकारला दिला.तसेच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आज पुण्यात कार्यक्रमासाठी येणार आहेत.तर त्यांनी या विद्यार्थ्यांना पाठ दाखवून न जाता आंदोलनाच्या ठिकाणी दोघांनी भेट देऊन प्रश्न सोडविण्याची मागणी यावेळी त्यांनी केली.

परीक्षा पॅटर्न 2025 पासून राबविण्यात यावा -राज्यसेवा मुख्य परीक्षा पॅटर्न 2025 पासून राबविण्यात यावा.या मागणीसाठी पुण्यातील अलका चौक येथे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वतीने आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले असून जोरदार घोषणा देण्यात येत आहे.

सरकारने विद्यार्थ्यांचा विचार करून निर्णय घ्यावा -आम्ही विद्यार्थी मागील अनेक वर्षांपासून राज्यसेवा परीक्षेची तयारी करीत आहोत.पण अचानक आयोगाकडून आदेश काढला जातो की 2023 पासून तुमच्या अभ्यासक्रमात बदल करण्यात येत आहे. हा निर्णय आम्हाला मान्य नाही.आयोगाने 2025 मध्ये तो नियम लागू करावा अशी आमची राज्य सरकारकडे मागणी आहे. राज्य सरकार अनेक निवडणुका पुढे घेत जात आहे. त्यामुळे आमचा अभ्यासक्रमाचा निर्णय 2025 पासून लागु करण्याचा निर्णय राज्य सरकारला सहज शक्य आहे. त्यामुळे राज्य सरकारने विद्यार्थ्यांचा विचार करून निर्णय घ्यावा.अशी मागणी यावेळी विद्यार्थ्यांच्या वतीने करण्यात येत आहे.

सरकारने फक्त आश्वासन दिली - राज्यसेवा मुख्य परीक्षा पॅटर्न 2025 पासून राबविण्यात यावा. या मागणीसाठी सातत्याने विद्यार्थ्यांच्या वतीने या आधी आंदोलने करण्यात आली. पण सरकारने फक्त आश्वासन दिली. नागपूर येथील अधिवेशनात देखील आंदोलन युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आलं. वेगळ्याच शिष्टमंडळाला बोलवण्यात आल.आत्ता जो पर्यंत आमची मागणी पूर्ण होत नाही तो पर्यंत अश्याच पद्धतीने आंदोलन करण्यात येणार असल्याचं यावेळी विद्यार्थ्यांनी सांगितले.

विद्यार्थी आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी - पुण्यात एमपीएससीचा अभ्यास करणारे विद्यार्थी मोठ्या संख्येने आहेत. अनेक वर्ष विद्यार्थी राज्यसेवा परीक्षेचा अभ्यास करतात. मात्र, 2023 मध्ये अभ्यासक्रमात बदल करण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांनी आक्रमक पावित्रा घेतला आहे. अभ्यासक्रमातील बदलास विरोध करत नव्या अभ्यासक्रमाबाबतच नियम किंवा नवा पॅटर्न 2025 मध्ये लागू करावा. या नव्या पॅटर्नबाबत जर सरकारने निर्णय घेतला नाही आम्ही आंदोलन असच सुरू ठेवू अस म्हणत मोठ्या संख्येने आंदोलक विद्यार्थी आंदोलनात सहभागी झाले आहे.

हेही वाचा -MahaBharti 2022: महाभरतीच्या नावाने सरकार केवळ इव्हेंट करत; स्पर्धा परीक्षा समन्वय समितीची जोरदार टीका

ABOUT THE AUTHOR

...view details