पुणे- लॉकडाऊनमुळे विविध राज्यात अडकलेल्या लोकांना त्यांच्या राज्यात पोहोचवण्यासाठी रेल्वे सोडण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने पुण्यात अडकलेले विद्यार्थी आणि नागरिक रेल्वेने जम्मू काश्मीरला रवाना झाले. जम्मू-काश्मीरचे 1हजार 27 विद्यार्थी आणि नागरिक पुण्यात अडकून पडले होते.
राज्य शासनाच्यावतीने पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी जम्मू-काश्मीर प्रशासनाला पाठपुरावा केला. त्यानंतर या अडकलेल्या लोकांना परतण्यासाठी परवानगी मिळाली. जम्मू काश्मीरचे 1 हजार 27 विद्यार्थी व नागरिक विशेष रेल्वेने पुण्यातून रवाना झाले. पुणे जिल्ह्यासह कोल्हापूर, सोलापूर, नंदुरबार, अहमदनगर, भिवंडी, रायगड जिल्ह्यातील विद्यार्थी आणि नागरिकांचा यात समावेश होता.