पुणे- विविध मागण्यांसाठी कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. सकाळपासूनच विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या मुख्य इमारतीसमोर आंदोलन सुरू केले. या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक स्तरावरील अनेक मागण्या आहेत. मात्र, या मागण्यांकडे महाविद्यालय प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप आहे. तसेच मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत धरणे कायम ठेवण्याचा इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे.
हेही वाचा -विवाह सोहळ्याला देशभक्तीचा रंग; पुण्यात अनोखा उपक्रम
विद्यार्थ्यांवर अन्याय करणाऱ्या प्रशासनाची त्वरित बदली करावी, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सहलीचे 1250 रुपये त्वरित परत करावे, विद्यार्थ्यांची स्टायपेंड त्वरित द्यावी, ग्रंथालय 24 तास सुरू करून कायमस्वरूपी ग्रंथपाल नियुक्त करावा, मुलींच्या वसतिगृहाचे बांधकाम जलद गतीने पूर्ण करावे, महाविद्यालयाचे मैदान इतर कोणालाही भाडेतत्वावर देऊ नयेत, उपोषणाला बसलेल्या विद्यार्थ्यांवर कारवाई करू नये, अशी या विद्यार्थ्यांची मागणी आहे.