महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Lady Professor Sextortion: विद्यार्थ्याने पाठवला प्राध्यापिकाचा 'तसला' व्हिडिओ तिच्या पतीला - student made nude video of lady professor

पुण्यातल्या एका नामांकित विद्यापीठाच्या विद्यार्थ्यानेच आपल्या प्राध्यापिकेचा न्यूड व्हिडिओ चित्रित करून तो तिच्या पतीला पाठवत व्हायरल करण्याची धमकी दिली. या बदल्यात विद्यार्थ्याने पाच हजार अमेरिकन डॉलरची मागणी केली. पती-पत्नीने तात्काळ हडपसर पोलीस ठाण्यात धाव घेत या प्रकरणाची तक्रार दिली.

Lady Professor Sextortion
'तो' व्हिडिओ तिच्या पतीला

By

Published : Jun 24, 2023, 5:47 PM IST

पुणे : याप्रकरणी मयांक सिंग (26, रा. पटणा, बिहार, सध्या पुणे) याच्याविरुध्द माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित प्राध्यापिकेचा आरोपी हा विद्यार्थी आहे. तो मयंक सिंग या नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून त्यांच्या संपर्कात नेहमी असायचा. यानंतर तो मोबाईल आणि व्हॉटसअप कॉलवरून त्यांच्या संपर्कात राहू लागला. यानंतर त्याने एकदा पीडितेला व्हिडीओ कॉल करून मी सांगतो तसे केले नाही तर आपल्यात झालेले बोलणे विद्यापीठात दाखवून बदनामी करेल, अशी धमकी दिली.

पीडितेचे न्यूड शूटिंग:यामुळे ती पीडित प्राध्यापिका घाबरून आरोपी सांगेल तसे करायला तयार झाली. आरोपीने प्राध्यापिकला अंगावरचे कपडे काढण्यास सांगितले. यानंतर त्याने तिचे न्यूड शूटिंग रेकॉर्ड केले. यानंतर हा व्हिडिओ दुसऱ्या एका आयडीवरून पीडिता आणि तिच्या पतीला पाठवण्यात आला. हा व्हिडिओ सगळीकडे पाठविण्याची धमकी देत पाच हजार अमेरिकन डॉलरची मागणी करण्यात आली. या बाबत हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अशोक गंधाले करत आहे.

इतर ठिकाणीही झाली आहेत अशी प्रकरणे..

व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी: मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये चंदीगड विद्यापीठासारखे प्रकरण समोर आले आहे. गोविंदपुरा येथील सरकारी आयटीआयमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीचे वॉशरूममध्ये कपडे बदलताना त्याच आयटीआयमध्ये शिकणाऱ्या सहकारी मुलांनी व्हिडिओ बनवला. त्यांनी पैशांसाठी आईला व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. या संपूर्ण घटनेने दु:खी झालेली मुलगी घर सोडून गायब झाली होती. ही घटना 17 सप्टेंबर, 2022ची आहे. पोलिसांनी याप्रकरणी आयटीआयमध्ये शिकणाऱ्या तीन विद्यार्थ्यांना आरोपी केले असून त्यापैकी एकाला ताब्यात घेण्यात आले आहे.

वॉशरूममध्ये कपडे बदलताना बनवला व्हिडिओ: भोपाळच्या अशोका गार्डन पोलिस स्टेशनचे प्रभारी आलोक श्रीवास्तव यांनी सांगितले की, भोपाळच्या पिपलानी पोलिस स्टेशन परिसरात राहणारा एक विद्यार्थी अशोक गार्डनच्या सरकारी आयटीआयमधून डिप्लोमा करीत आहे. 17 सप्टेंबर रोजी विश्वकर्मा जयंतीनिमित्त संस्थेत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमानंतर विद्यार्थिनी कपडे बदलण्यासाठी वॉशरूममध्ये पोहोचली, तेव्हा राहुल यादव, खुशबू ठाकूर आणि अयान या विद्यार्थ्यांनी तिचा व्हिडिओ बनवला. व्हिडीओ बनवल्यानंतर आरोपीने तो व्हिडीओ विद्यार्थ्याच्या मित्राला दाखवून विद्यार्थ्याकडे सात हजार रुपयांची मागणी केल्याचे सांगितले. पैसे न दिल्यास व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला जाईल. हा प्रकार तिच्या मैत्रिणीने विद्यार्थिनीला सांगितल्यावर ती वैतागली.

हेही वाचा:

  1. Sonali Phogat Murder Case : सोनाली फोगाट खून प्रकरण : मारेकरी सुधीर संगवानला गोवा न्यायालयाकडून जामीन मंजूर
  2. Accused Arrested From Swamp: गुन्ह्यांची हॉफ सेंचुरी पार करणाऱ्या आरोपीला फिल्मी स्टाईलने घेतले ताब्यात
  3. Rape On Girl In Mumbai : बाप-लेकीच्या नात्याला कलंक! पित्यानेच केला मुलीवर बलात्कार, नराधम बापासह शेजाऱ्यास अटक

ABOUT THE AUTHOR

...view details