पुणे- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) राज्य सेवा पूर्व परीक्षा आज (रविवार) घेण्यात आली. कोरोनाच्या पाश्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करून विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. पुण्यातील एका केंद्रावर एका विद्यार्थ्याने पीपीई किट घालून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पूर्व परीक्षा दिली आहे.
पुणे; पीपीई किट घालून 'त्याने' दिली एमपीएससीची परीक्षा - student given MPSC exam-wearing-ppe-kit in pune
राज्यात 1800 तर पुण्यात एकूण 77 परीक्षा केंद्रावर एमपीएससीची परीक्षा घेण्यात आली. एकूण 2 लाख 62 हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे. राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता आयोगाने जाहीर केलेल्या नियमानुसारच विद्यार्थ्यांना परीक्षा दिली.
हेही वाचा-100 कोटींच्या वसुलीप्रकरणात अनिल परब यांचीही चौकशी करा - किरीट सोमैय्या
त्या विद्यार्थ्याला एकटच बसविण्यात आलं
ज्या उमेदवारांना करोनाची लक्षणे दिसून येत असल्यास, त्यांना पीपीई कीट उपलब्ध करून देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आयोगाने घेतला आहे. त्यानुसार त्या विद्यार्थ्याला कोरोनाची लक्षणे असल्याने त्याला एकट्यालाच बसविण्यात आले होते. आज दोन पेपर होते. पहिल्या पेपर नंतर मध्यन्तरी 1 ते दिड तास विद्यार्थ्यांना बाहेर सोडून पून्हा केंद्रावर परीक्षेसाठी सोडण्यात आले. मात्र, या विद्यार्थ्याला लक्षणे असल्याने त्याला दोन्ही पेपरला एका रूममधेच बसविण्यात आले.
परीक्षेच्या आधी केंद्र सॅनिटायझर करून घेतले
राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता आज होणाऱ्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पूर्व परीक्षेच्या आधी ज्या ज्या केंद्रावर परीक्षा होणार आहे त्या-त्या केंद्रावर सॅनिटायझर करून घेण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनाही कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करून परीक्षा दिली. परीक्षा केंद्रात प्रवेश करताना किमान तीन पदरी कापड्याचा (मास्क) परिधान करणे अनिवार्य करण्यात आला होता. तसेच परीक्षा कक्षामध्ये मास्क, हातमोजे व सॅनिटाईझरची लहान पिशवी असलेले प्रत्येकी एक किट उपलब्ध करून देण्यात आले होते. त्याचा वापर करणे उमेदवारांना अनिवार्य होते.
हेही वाचा-गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात मलबार हिल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल