पुणे - CAA, NRC आणि ईव्हीएम विरोधात तसेच DNAच्या आधारावर NRC लागू करा, या मागणीसाठी बहुजन क्रांती मोर्चा तर्फे भारत बंदची घोषणा करण्यात आली आहे. 29 तारखेला देशव्यापी भारत बंदची हाक देण्यात आली आहे.
29 जानेवारीला बामसेफची भारत बंदची हाक - 29 जानेवारीला भारत बंदची हाक
CAA, NRC आणि ईव्हीएम विरोधात तसेच DNAच्या आधारावर NRC लागू करा, या मागणीसाठी बहुजन क्रांती मोर्चा तर्फे भारत बंदची घोषणा करण्यात आली आहे. 29 तारखेला देशव्यापी भारत बंदची हाक देण्यात आली आहे.
हेही वाचा -बारामतीत बिबट्याची दहशत; अखेर पुण्याहून मागवला पिंजरा
CAA, NRC हा कायदा मुस्लिमांच्या विरोधामध्ये नसून, तो एस.सी, एन.टी, ओबीसी आणि धार्मिक अल्पसंख्यांक म्हणजेच शीख, जैन, बुद्धिष्ट, ख्रिश्चन, लिंगायत, मुस्लीम यांच्या विरोधामध्ये आहे. आरएसएस प्रणित केंद्र सरकारद्वारे NRC केवळ मुस्लिमांच्या विरोधात असल्याचे षड्यंत्र आहे, असा दावा बहूजन क्रांती मोर्चाकडून करण्यात आला आहे. भारतीय नागरिकत्व सुधारणा कायद्यासाठी भारताच्या मूळ रहिवासी लोकांनाच 70 वर्षांपूर्वींचा रहिवासी असल्याचा पुरावा मागितला जातो आहे. रहिवासी असलेल्या पुराव्यासाठी आधारकार्ड, रेशनकार्ड, मतदानकार्ड, पॅनकार्ड ग्राह्य धरले जाणार नाही. तर जन्माची नोंद किंवा शैक्षणिक दाखला हेच ग्राह्य धरले जाणार आहे. असेही बहुजन क्रांती मोर्चाकडून सांगण्यात आले आहे.