पुणे : विविध कामाचा उद्घाटन सोहळा आणि लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान कार्यक्रमाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी पुण्यात येत आहेत. त्या निमित्ताने पुणे पोलिसांकडून बंदोबस्तात चांगलीच वाढ करण्यात आली आहे. दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर विशेष तपास मोहीम राबवण्यात येत आहे, त्याच अनेक गुन्हेगारांची झाडाझडती घेण्यात येत आहे.
पुणे शहरातील गुंडांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिस दोन दिवसांपासून रात्री विशेष मोहीम राबवत आहेत. मध्यरात्री पोलिसांनी शहरातील, हजारो गुन्हेगारांची झाडाझडती घेतली. त्यापैकी 602 सराईत गुंड गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे. रात्री विविध पोलीस स्टेशन ठाण्यातील गुन्हे शाखेच्या वतीने विशेष मोहिमेतील ही कारवाई करण्यात येत आहे. व्हि व्हिआयपींच्या दौऱ्याच्यावेळी अनुचित प्रकार होऊ नयेत यासाठी अशा प्रकारच्या कारवाया केल्या जातात.
वेगवेगळ्या गुन्ह्यात रेकॉर्ड वर असलेल्यां पैकी बेकायदा शस्त्र बाळगण्याच्या प्रकरणात 11 जणांना अटक करण्यात आली आहे. जुगार प्रतिबंधक कायद्या अंतर्गत २८ जणांना पकडले आहे. यात शहरातील बस स्थानके, रेल्वे स्थानक, हॉटेल्स, लॉजची तपासणी करण्यात येत आहे. त्यासोबतच नाकाबंदी करण्यात येत आहे. यात संशयित वाहन चालकाची चौकशी करण्यात येत आहे. नाकाबंदीत आत्ता पर्यंत 934 वाहन चालकाची तपासणी करण्यात आली आहे.