पुणे- कोरोनाचा संसर्ग थाबविण्यासाठी राजगुरूनगर प्रशासनाने खबरदारीची पाऊले उचलली आहे. शहरातील संपूर्ण रस्ते बंद करण्यात आले असून आजपासून ३ दिवसांचा कडकडीत लॉकडाऊन पाळण्यात येणार आहे. हा निर्णय नगरपरिषदेच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
पुण्यातील राजगुरूनगरात आजपासून तीन दिवसांचा कडकडीत लॉकडाऊन - city president rajgurunagar
बैठकीला शहरातील व्यापारी, नागरिक, नगरसेवक आणि पोलीस अधिकारी उपस्थित होते. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करून समूह संसर्ग टाळण्यासाठी ३ दिवसांचा लॉकडाऊन पाळावे, असे आवाहन नगराध्यक्ष शिवाजी मांदळे यांनी केले आहे.
नगरपरिषदेची बैठक
बैठकीला शहरातील व्यापारी, नागरिक, नगरसेवक आणि पोलीस अधिकारी उपस्थित होते. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करून समूह संसर्ग टाळण्यासाठी ३ दिवसांचा लॉकडाऊन पाळावे, असे आवाहन नगराध्यक्ष शिवाजी मांदळे यांनी केले आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत मेडिकल, दवाखाने वगळता सर्व सेवा बंद ठेवण्यात येणार असून अत्यावश्यक सेवांची घरपोच सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
हेही वाचा-कोरोनाबाबत दिलासादायक बातमी.. पुण्यातील 41 वर्षीय रुग्णाच्या प्रकृतीत सुधारणा, रिपोर्ट निगेटिव्ह