महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रुग्णांची लूट करणाऱ्या खासगी रुग्णालयांवर कडक कारवाई करणार - आयुष प्रसाद - खासगी रुग्णालयांकडून लूट

चाकण औद्योगिक वसाहत व खेड तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागात दिवसेंदिवस कोरोनाचा समूह संसर्ग वाढत आहे. कोरोना रुग्णांचा आकडा बाराशेच्या वर गेला आहे. ऑक्सिजन बेड उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. खासगी रुग्णालयांकडून रुग्णांची लूट होत असल्याच्याही तक्रारी येत आहेत.

Strict action will  against private hospitals for robbing patient in pune
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद

By

Published : Jul 31, 2020, 6:52 PM IST

पुणे - चाकण औद्योगिक वसाहत व खेड तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागात दिवसेंदिवस कोरोनाचा समूह संसर्ग वाढत आहे. कोरोना रुग्णांचा आकडा बाराशेच्या वर गेला आहे. ऑक्सीजन बेड उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. खासगी रुग्णालयांकडून रुग्णांची लूट होत असल्याच्याही तक्रारी येत आहेत. याची गांभीर्याने दखल घेऊन कोरोना रुग्णांची लूट करणाऱ्या रुग्णालयांवर कडक कारवाई करणार असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.

चाकण औद्योगिक वसाहत व आळंदी, राजगुरुनगर, चाकण व खेड तालुक्यातील ग्रामीण भागात मागील दीड महिन्यांपासून रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यातून मृत्यूदरही वाढत असल्याने ही बाब प्रशासनाकडून गांभीर्य घेऊन कडक उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. चांडोली, चाकण, आळंदी ग्रामीण रुग्णालयात ऑक्सीजन बेड व व्हेंटिलेटर बेड तयार केले असून, लवकरच रुग्णांना उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे आयुष प्रसाद यांनी सांगितले.

मागील काही दिवसांपासून खेड तालुक्यातील खाजगी रुग्णालयांकडून शासकीय नियमांपेक्षा अधिक बिल आकारणी केली जात असल्याच्या तक्रारी वारंवार येत आहेत. त्यामुळे प्रशासनाच्या आदेशाचा भंग केला म्हणून खासगी रुग्णालयांवर भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम 1897 आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व भारतीय दंड सहित (45 ऑफ 1860 ) कलम 188 नुसार कारवाई करण्याची तरतूद करण्यात आली आहे. खासगी रुग्णालयांची तत्काळ तपासणी करून कडक कारवाईची अंमलबजावणी करण्याचे आदेशही देण्यात आल्याचे आयुष प्रसाद यांनी सांगितले

राजगुरुनगर, चाकण, आळंदी शहर व शहरालगत असणाऱ्या 14 खासगी रुग्णालयांना प्रशासनाच्या माध्यमातून अधिग्रहित करण्यात आले आहे. या रुग्णालयांवर नियंत्रणाची संपूर्ण जबाबदारी वैद्यकीय अधिक्षक यांच्यावर सोपवण्यात आली आहे. आदेशाचे पालन न झाल्यास त्यावर तालुका दंडाधिकारी तथा तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाईची तरतूद करण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details