पुणे -ऐन निवडणुकीच्या तोंडावर जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी गावात एका व्यक्तीच्या घरात स्फोटकांचा साठा आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. राजाराम अभंग असे या व्यक्तीचे नाव असून राजाराम हा पिंपळवाडी गावात एका झोपडीत रहात आहे.पुणे एटीएस व पुणे ग्रामीण पोलिसांनी आरोपी राजाराम अभंग याची कसून चौकशी केली असता, यापुर्वीही असाच स्फोटकांचा साठा तयार केला होता. त्यावेळी भावकीच्या वादात त्याने स्फोटही घडविला होता. रात्री उशिरा पोलिसांनी त्याचा घरावर छापा टाकून ही कारवाई केली.आरोपीकडून ५९ शस्त्रे हस्तगत करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
राजाराम हा वयाच्या ६० नंतरही ग्रामीण भागात अशा पद्धतीने स्पोटके का तयार करतो, त्यामागे अजुन काही यंत्रणा आहे का?असे अनेक प्रश्न घेऊन पुणे एटीएस व पुणे ग्रामीण पोलीस तपास करत आहे.पिपळवंडी गावात पोलिसांची कसून चौकशी सुरु आहे. राजारामला अजुन कोणसाथीदार आहे याचाही तपास केला जात आहे. काही दिवसांपुर्वी राजाराम अभंग याच्याकडे अशीच काही स्फोटके आढळून आली होती. मंगळवारी पुन्हा राजाराम याच्या घरावर पोलिसांनी छापा मारला असता विविध प्रकारातील शक्तिशाली स्फोटके आढळून आली असून पोलीस यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली आहे.